आमदार, खासदार निधीतील वास्तूंचे जुने भाडेकरार रद्द करणार

ठाणे,13 सप्टेंबर 2017/AV News Bureau:

ठाणे महापालिका क्षेत्रात आमदार,खासदार निधी अथवा महापालिकेच्या निधीमधून ज्या विविध वास्तू बांधून नाममात्र दराने देण्यात आल्या होत्या,त्या वास्तूंचे जुने भाडे करार रद्द करून 2 ऑक्टोबरपर्यंत नवीन स्वारस्य देकार मागविण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्थावर मालमत्ता विभागाला दिले आहेत. सदर निर्णयामुळे महापालिका क्षेत्रातील जवळपास 57 वास्तूंसाठी नवीन स्वारस्य देकार मागविण्यात येणार आहेत.

  • ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये विविध वास्तू आमदार निधी, खासदार निधी आणि ठाणे महापालिका निधीमधून विविध वास्तू बांधून त्या नाममात्र भाडेकरार तत्वावर विविध संस्थांना चालविण्यास देण्यात आल्या आहेत. सदर वास्तूंचे भाडे आकारण्याबाबत धोरण निश्चित करण्याबाबत महापालिका आयुक्त यांनी स्थावर मालमत्ता विभागाचा आढावा घेतला.
  • ठाणे शहरातील एकूण 57 वास्तूंचा समावेश असून 7 समाजमंदीर, 26 व्यायामशाळा, 6 रंगमंच, 8 वाचनालये, 1 पाळणाघर, 4 बालवाडी, 3 अभ्यासिका, 1 मार्केट, 1 क्रीडा संकुल आदींचा समावेश आहे.