क्रीडा शिष्यवृत्तीसाठी अर्ज करा

  • नवी मुंबई महापालिकेच्यावतीने गुणवंत खेळाडूंना आवाहन

 नवी मुंबई, 14 ऑक्टोबर 2017/AV News Bureau:

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातून विविध क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे  यासाठी शहरातील गुणवंत खेळाडूंना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. यासाठी गुणवंत खेळाडूंकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.  navi mumbai corporation sports scholarship 

  • महानगरपालिका क्षेत्रात वास्तव्य करणारे आणि शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2016 -2017 मध्ये सहभाग घेतलेले तसेच प्राविण्य प्राप्त खेळाडू, असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटी तर्फे आयोजित आंतरविद्यापीठ (राष्ट्रीय) स्तरावर सहभागीव प्राविण्य प्राप्त खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती  लागू करण्यात आली आहे.  navi mumbai corporation sports scholarship 
  • पात्र खेळाडूंनी “क्रीडा शिष्यवृत्ती” करीता विहित नमुन्यातील अर्ज व इतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता 30 नोव्हेंबर 2017 पर्यंत नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा विभागाकडेकरावयाची आहे.
  • मुदतीनंतर आलेल्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही.  navi mumbai corporation sports scholarship 
  • अधिक माहितीकरीता नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा विभाग, स्व.राजीव गांधी क्रीडा संकुल, से. 4, सी.बी.डी., बेलापूर, नवी मुंबई ( दूरध्वनी क्र.27573294 ) येथे संपर्क साधावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.