4 मार्च रोजी मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक

मुंबई, 3 मार्च 2018/अविरत वाटचाल न्यूजः

रेल्वे मार्गाची दुरूस्ती तसेच इतर तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वेने मेन आणि हार्बर मार्गावर उद्या 4 मार्च रोजी मेगाब्लॉक जाहीर केला आहे. या मेगाब्लॉकच्या काळात दोन्ही मार्गावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.

मेन लाइन

  • ठाणे-कल्याण डाउन स्लो मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत.

 

  • सकाळी 10.47 ते दुपारी 3.50 या काळात मुलुंडवरून सुटणाऱ्या डाउन स्लो गाड्या मुलुंड आणि कल्याण स्टेशनच्या दरम्यान डाउन फास्ट मार्गावरून चालविण्यात येतील. या गाड्या ठाणे, दिवा तसे डोंबिवली स्थानकांवर थांबणार आहेत. त्यामुळे या गाड्या 10 मिनिटे उशिराने धावतील.
  • डाउन स्लो मार्गावरील गाड्या मेगाब्लॉकच्या काळात कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकूर्ली स्थानकांवर थांबणार नाहीत. त्यामुळे या रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांना ठाणे,दिवा, डोंबिवली,कल्याण स्थानकांवरून यात्रा करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
  • सकाळी 10.37 ते दुपारी 3.6 या काळात कल्याणवरून सुटणाऱ्या अप फास्ट गाड्या नेहमीच्या थांब्यांव्यतिरिक्त दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील. त्यामुळे या गाड्या 15  मिनिटे उशिराने धावतील.
  • सकाळी 10.5 ते  दुपारी 2.54 या काळात सीएसएमटीवरून सुटणाऱ्या डाउन फास्ट गाड्या नेहमीच्या थांब्यांव्यतिरिक्त घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा स्थानकांवर थांबतील. त्यामुळे या गाड्या 20 मिनिटे उशिराने धावतील.
  •  सकाळी 11 ते सायंकाळी 5 या काळात सीएसएमटीवरून सुटणाऱ्या आणि पोहोचणाऱ्या सर्व स्लो मार्गावरील गाड्या 10 मिनिटे उशिराने धावतील.

हार्बर लाइन

  • सीएसएमटी-चुनाभट्टी/वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 पर्यंत तसेच चुनाभट्टी/वांद्रे-सीएसएमटी अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 या काळात मेगाब्लॉक

 

  • सकाळी 11.34 ते दुपारी 4.47 या काळात सीएसएमटी/वडाळा रोड येथून वाशी, बेलापूर,पनवेलसाठी सुटणाऱ्या सर्व गाड्या तसेच सकाळी 9.56 ते सायंकाळी 4.43 या काळात सीएसएमटी ते वांद्रे, अंधेरीसाठी सुटणाऱ्या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
  • सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 या काळात पनवेल,बेलापूर,वाशी ते सीएसएमटी दरम्यान धावणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सर्व गाड्या तसेच सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.9 या काळात अंधेरी,वांद्रे ते सीएसएमटी दरम्यान धावणाऱ्या अप हार्बर मार्गावरील गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
  • दरम्यान, प्रवाशांच्या सेवेसाठी हार्बर मार्गावर पनवेल-कुर्ला दरम्यान फलाट क्रमांक 8 वरून विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.
  • हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 ते सायंकाळी 6 या काळात पश्चिम रेल्वे आणि मेन लाइनवरून प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे.