मडगाव-पनवेल दरम्यान विशेष गाड्या

  • होळी,लागोपाठच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर 3 मार्चला विशेष गाड्या

नवी मुंबई, 1 मार्च 2018/अविरत वाटचाल न्यूज:

होळी आणि लागोपाठच्या सुट्ट्यामुळे कोकणात गेलेल्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेच्या सहकार्याने कोकण रेल्वे मार्गावर पनवेल ते मडगावदरम्यान 3 मार्च रोजी विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत.

गाडी क्रमांक 01026/01025 मडगाव-पनवेल-मडगाव विशेष

  1. गाडी क्रमांक 01026 मडगाव-पनवेल विशेष ही गाडी 3 मार्च रोजी मडगावहून दुपारी 1.30 वाजता सुटेल आणि त्याचदिवशी रात्री 11 वाजता पनवेल स्थानकात पोहोचेल.
  2. गाडी क्रमांक 01025 पनवेल-मडगाव ही गाडी 3 मार्च रोजी रात्री 11.55 ला पनवेलहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 11.10 वाजता मडगाव स्थानकात पोहोचेल.

गाडीचे थांबे

या विशेष गाड्यांना रोहा,खेड, चिपळुण,संगमेश्वर रोड, रत्नागिरी,कणकवली,कुडाळ,थिविम आणि करमाळी या रेल्वे स्थानकांवर थांबवण्यात येणार आहेत.

डब्यांची रचना

या विशेष गाड्यांना 23 डबे जोडण्यात येणार आहेत. त्यामध्ये एसी थ्री टायरचे 3 डबे, स्लीपरचे 12 डबे, जनरलचे 6 डबे, एसएलआर 2 डबे जोडण्यात येणार आहेत.