आदिवासी विकास निधी योजनांच्या मूल्यमापनासाठी ‘क्वेस्ट’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

अविरत वाटचाल न्यूज/  मुंबई, 10 एप्रिल 2018:

आदिवासी विकासासाठी शासनातर्फे आखण्यात आलेल्या विकासनिधी व योजनांचे नियोजन, नियंत्रण व मूल्यमापन क्वेस्ट केंद्राव्दारे होणार आहे. क्वेस्ट (Quality Evaluation for Sustainable Transformation) Office या मूल्यमापन केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले.

यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे, राज्यमंत्री आदिवासी विकास अंबरीशराव आत्राम, मुख्य सचिव सुमीत मल्लिक, प्रधान सचिव मनीषा वर्मा उपस्थित होते.

हे केंद्र आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेंतर्गत मुंबईत स्थापन करण्यात आले असून मुख्य कार्यालय पुणे येथे आहे.

क्वेस्ट केंद्र विषयी

  • देशातील पहिले शासकीय योजनांचे संनियत्रण, मूल्यमापन करणारे केंद्र
  • विकास योजनांची परिणामकारकता वाढविणे, उपलब्ध निधींचा योग्य वापर करणे, नाविन्यपूर्ण कार्यक्रम राबविणे यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
  • क्वेस्ट अंतर्गत आदिवासी उपयोजना (टीएसपी), केंद्रीय अर्थसहाय्य आणि विशेष प्रकल्पांचे योग्य नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मोठे योगदान राहणार आहे.
  • हे केंद्र आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेंतर्गत मुंबईत स्थापन केले असून, त्याचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे.