गणपती स्पेशल राजापूर, वैभववाडीला थांबणार

  • कोकण रेल्वेचा चाकरमान्यांना दिलासा

अविरत वाटचाल न्यूज

नवी मुंबई, 21 जुलै 2018:

गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी लक्षात घेवून पश्चिम रेल्वेच्या सहाकार्याने कोकण रेल्वे मार्गावर गणपती स्पेशल गाड्या चालविण्यात येणार आहे. या गाड्यांचा अधिकाधिक चाकरमान्यांना लाभ मिळावा यासाठी राजापूर रोड आणि वैभववाडी रोड स्थानकांवर या गाड्यांना थांबा देण्यात येणार आहे.

गणपती स्पेशल गाड्या (डाउन)

  1. 09001 मुंबई सेंट्रल- मंगळुरु जंक्शन
  2. 09009 वांद्रे – मंगळुरु जंक्शन
  3. 09011 वांद्रे- मंगळुरु जंक्शन
  4. 09007 मुंबई सेंट्रल-थिविम
  5. 09418 अहमदाबाद –थिविम
  6. 09416 अहमदाबाद- मडगाव जं.

या सर्व डाउन गाड्या  राजापूर रोड स्थानकात सकाळी 10.38 ला थांबतील तर  वैभववाडी रोड स्थानकात सकाळी 11.55 ला थांबतील.

 

गणपती स्पेशल गाड्या (अप)

  1. 09002 मंगळुरु जंक्शन- मुंबई सेंट्रल
  2. 09010 मंगळुरु जंक्शन – वांद्रे
  3. 09012 मंगळुरु जंक्शन – वांद्रे
  4. 09008 थिविम – मुंबई सेंट्रल
  5. 09417 थिविम- अहमदाबाद
  6. 09415 मडगाव जं.- अहमदाबाद

या सर्व अप गाड्या  वैभववाडी रोड स्थानकात सकाळी 8.10 ला तर राजापूर रोड स्थानकात सकाळी 8.30 ला थांबतील तर  थांबतील.

=============================================================================================================================

इतर बातम्यांचाही मागोवा

  • गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर 132 विशेष गाड्या
    https://goo.gl/sJHTGd
  • गणेशोत्सवासाठी कोकणात पश्चिम रेल्वेतर्फे गाड्या
    https://goo.gl/ct7xUJ
==============================================================================================================================
  • घोट नदीत कार कोसळल्यानंतरचा थरार