मेन, हार्बरवर 13 मे रोजी मेगाब्लॉक

अविरत वाटचाल न्यूज

मुंबई,11 मे 2018:

रेल्वे मार्गावरील दुरूस्ती तसेच तांत्रिक देखभालीसाठी मध्य रेल्वेने येत्या 13 मे रोजी मेन आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक जाहीर केला आहे. त्यामुळे मेन आणि हार्बर मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून प्रवाशांनी मेगाब्लॉकदरम्यानचे वेळापत्रक पाहून प्रवास करावा , असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

मेन लाइन – कल्याण-ठाणे अप स्लो मार्गावर सकाळी 11.20 ते सायंकाळी 4.20  पर्यंत मेगाब्लॉक

  • कल्याणवरून सुटणाऱ्या स्लो आणि सेमी स्लो मार्गावरील गाड्या सकाळी 10.48 ते सायंकाळी 4.14 या काळात कल्याण आणि मुलुंड रेल्वे स्थानकांच्या दरम्यान अप फास्ट मार्गावर चालविण्यात येतील. त्यानंतर मुलुंड स्थानकापासून अप स्लो मार्गावरून चालवून सर्व स्थानकांवर थांबा देण्यात येईल.
  • मेगाब्लॉकच्या काळात अप स्लो मार्गावरील गाड्या ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर थांबणार नाहीत. त्यामुळे या स्थानकांवरील प्रवाशांना ठाणे, दिवा, डोंबिवली आणि कल्याण मार्गे प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
  • सकाळी 10.5 ते दुपारी 2.45 या काळात सीएसएमटीवरून सुटणाऱ्या सर्व डाउन फास्ट गाड्या नेहमाच्या थांब्यांव्यतिरिक्त घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि दिवा स्थानकांत थांबतील. त्यामुळे या गाड्या 15 मिनिटे उशिराने धावतील.
  • कल्याणवरून सुटणाऱ्या फास्ट मार्गावरील गाड्या सकाळी 11.23 ते सायंकाळी 4.2 या काळात आपल्या निर्धारित थांब्यांव्यतिरिक्त  दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील. या गाड्या 15 मिनिटे उशिराने धावतील.
  • सकाळी 11 ते सायंकाळी 5 या काळात सीएसएमटीवरून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व डाउन फास्ट गाड्या 10 मिनिटे उशिराने धावतील.

 

हार्बरवर मेगाब्लॉक

  • सीएसएमटी-चुनाभट्टी/वांद्रे डाउन हार्बर मार्गावरील सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 या काळात तसेच चुनाभट्टी/वांद्रे ते सीएसएमटी अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 या काळात मेगाब्लॉक
  • सकाळी 11.34 ते दुपारी 4.47 या काळात सीएसएमटी/वडाला रोड ते वाशी,बेलापूर, पनवेल या मार्गावर धावणाऱ्या सर्व गाड्या तसेच सकाळी 9.56 ते सायंकाळी 4.43 या काळात सीएसएमटी ते वांद्रे, अंधेरी, गोरेगाव दरम्यान मेगाब्लॉक
  • सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 या काळात पनवेल, बेलापूर,वाशीहून सीएसएमटीला जाणाऱ्या सर्व गाड्या तसेच सकाळी 10.45 ते दुपारी 4.58 या काळात अंधेरी, वांद्रे, गोरेगावहून सीएसएमटीला जाणाऱ्या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

 

मेगाब्लॉकच्या काळात विशेष गाडी

  • हार्बर मार्गावर मेगाब्लॉकच्या काळात प्रवाशांच्या सेवेसाठी फलाट क्रमांक 8 वरून पनवेल-कुर्लादरम्यान विशेष गाड्या चालविण्यात येतील.

 

पश्चिम आणि मेनवरून प्रवासाला परवानगी

  • हार्बर मार्गावरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना सकाळी 10 ते सायंकाळी 6 या काळात पश्चिम रेल्वे तसेच मेन लाइनवरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.