व्वा ! जन सायकल नवी मुंबईकरांच्या पसंतीस

  • ४ दिवसांत १७०० युलू अप डाउनलोड, ४९५ नागरिकांनी सायकल चालवली

अविरत वाटचाल न्यूज

नवी मुंबई, 5 नोव्हेंबर २०१८:

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने प्रदूषणमुक्त वाहन सायकलींगला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेल्या “जन सायकल सहभाग प्रणाली” (Public Bicycle Sharing System) या अभिनव संकल्पनेला नवी मुंबईकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. 1 नोव्हेंबरला या प्रणालीचा नेरूळ येथील कै.विजयाताई म्हात्रे ज्वेल ऑफ नवी मुंबई याठिकाणी शुभारंभ झाल्यानंतर चारच दिवसात 1700 हून अधिक नागरिकांनी या प्रणालीचा उपयोग करण्यासाठी आवश्यक युलू ॲप डाऊनलोड करून घेतले असून प्रत्यक्षात नागरिकांनी 495 राईडस् केल्या आहेत.

  • नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा पर्यावरणशील शहर म्हणून विकास होण्याच्या दृष्टीने वाहतुक समस्येला पर्याय म्हणून कमी अंतरासाठी खाजगी वाहनांचा वापर कमी व्हावा व सायकल सारखे प्रदूषणमुक्त वाहन वापराला प्राधान्य देणारी ही प्रणाली असून पहिल्या टप्प्यात ज्वेल ऑफ नवी मुंबई, नेरुळ स्टेशन, वंडर्स पार्क, डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटी, सेक्टर 6 पेट्रोल पंप, ग्रँड सेंट्रल मॉल सिवूड आणि महापालिका मुख्यालय अशा सात ठिकाणी सायकल मिळण्याचे व सोडण्याचे पॉईट्स ठेवण्यात आले आहेत. टप्प्याटप्प्याने संपूर्ण नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात वर्दळीच्या ठिकाणी सायकल पॉईंट्सचे नियोजन करण्यात येत आहे.

 

  • आतंरराष्ट्रीय स्तरावर नामांकीत युलू बाईक्स प्रा. लि. या संस्थेमार्फत प्रणालीची कार्यवाही करण्यात येत असून सायकलीच्या वापरासाठी yulu हे मोबाईल ॲप आपल्या स्मार्ट फोनवर डाऊनलो़ड करून घेणे आवश्यक आहे. सायकलवरील बारकोड मोबाइलमध्ये डाऊनलोड केलेल्या ॲपमध्ये स्कॅन केल्यानंतर सायकलचे लॉक उघडण्याची सुविधा आहे.या ॲपमध्ये सायकल स्टेशन असलेली नजीकची सर्व ठिकाणे दिसण्याची सुविधा आहे. ॲपव्दारे नागरिकांनी आपले जाण्याचे ठिकाण निवडून तेथील सायकल स्टेशनवर ही सायकल सोडावी व ॲपव्दारे एन्ड करून पुन्हा लॉक करावी. यामधील प्रत्येक राईड 30 मिनीटांची असेल व पहिल्या राईडसाठी 30 मिनिटांकरिता रू. 1/- इतका नाममात्र दर असेल.

 

या ॲपव्दारे सायकल उपलब्ध करून घेण्यासाठी रिफंडेबल सिक्युरिटी डिपॉझिट रू.100/- भरणा करावे लागेल. त्यामध्ये 5 राईड्स विनामूल्य मिळतील. पेटीएम, फोन पे, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड याव्दारे ॲपमध्ये रक्कम भरणा करता येईल. रिटेल राईड्स मध्ये 30 मिनीटांच्या एका राईडसाठी रू. 10/- इतकी नाममात्र रक्कम आकारण्यात येईल. तसेच राईड पॅकेजेस मध्ये युलू 30 : रू. 200/- मध्ये 30 राईड्स, युलू 60 : रू. 300/- मध्ये 60 राईड्स असे पर्याय उपलब्ध आहेत.

=====================================================================================================================

इतर बातम्यांचाही मागोवा

  • रन फॉर स्वच्छता !

 

=================================================================================================================

  • सिडको निर्मित इमारतींच्या पुनर्बांधणीबाबत महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांची भूमिका