अहमदनगरमध्ये डॉ. सुजय विजय पाटील यांचा विजय, राष्ट्रवादीच्या संग्राम जगताप यांना धक्का

अविरत वाटचाल न्यूज  नेटवर्क

अहमदनगर, २३ मे २०१९ः

काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखेपाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम अरुणकाका  जगताप यांचा दणदणीत पराभव केला. सुजय यांना ७ लाख ४ हजार ६६० मते मिळाली. तर संग्राम जगपात यांना ४ लाख २३ हजार १८६ मते मिळाली. सुजय यांना  २ लाख ८१ हजार  ४७४ अधिक मते मिळाली.  देशभरात काँग्रेसचा दारूण पराभव झाला आहे. त्यामुळे सुजय पाठोपाठ राधा कृष्ण विखे पाटील हेदेखील लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.

 

अहमदनगर  लोकसभा मतदारसंघ २०१९

क्रमांक उमेदवाराचे नाव पक्ष मते टक्केवारी
1 वाकले नामदेव अर्जुन बहुजन समाज पार्टी 6692 0.56
2 डॉ. सुजय राधाकृष्ण विखेपाटील भारतीय जनता पार्टी 704660 58.54
3 संग्राम अरुणकाका जगताप राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी 423186 35.15
4 कलीराम बहिरु पोपलघट भारतीय नवजवान सेना 3192 0.27
5 धिरज मोतीलाल बताडे राइट टु रिकॉल पार्टी 1492 0.12
6 फारुख इस्‍माईल शेख भारतीय प्रजा सुराज्य पक्ष 2502 0.21
7 सुधाकर लक्ष्‍मण आव्‍हाड वंचित बहुजन अघाडी 31807 2.64
8 संजय दगडू सावंत बहुजन मुक्ति पार्टी 1507 0.13
9 आप्पासाहेब नवनाथ पालवे अपक्ष 716 0.06
10 कमल दशरथ सावंत अपक्ष 1317 0.11
11 दत्‍तात्रय आप्‍पा वाघमोडे अपक्ष 971 0.08
12 भास्‍कर फकिरा पाटोले अपक्ष 1242 0.1
13 रामनाथ गहिनीनाथ गोल्‍हार अपक्ष 1268 0.11
14 शेख आबिद हुसैन मोहम्‍मद हनीफ अपक्ष 2488 0.21
15 साईनाथ भाऊसाहेब घोरपडे अपक्ष 3986 0.33
16 सुपेकर ज्ञानदेव नरहरी अपक्ष 2767 0.23
17 इंजी. संजीव बबनराव भोर अपक्ष 3838 0.32
18 संदिप लक्ष्‍मण सकट अपक्ष 3745 0.31
19 श्रीधर जाखुजी दरेकर अपक्ष 2349 0.2
20 NOTA यातील कोणीही नाही 4072 0.34
एकूण    1203797

=======================================================

इतर बातम्यांचाही मागोवा