१२ जुलै रोजी वाशी गावात होणार गॅस सिलिंडरचे वितरण

युवा नेते निशांत भगत, संदीप भगत यांचा नागरिकांपर्यंत गॅस सिलिंडर पोहोचविण्याचा निर्धार

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, ११ जुलै २०२०

कोरोना संसर्गामुळे सध्या लॉकडाउनची परिस्थिती आहे. त्यामुळे नागरिकांना गॅस सिलिंडरसारख्या आवश्यक सुविधा मिळवताना अडचणी निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांनी नवी मुंबई सामाजिक पूनर्वसन संस्थेच्या माध्यमातून स्थानिक महापालिका, पोलीस प्रशासन तसेच गॅस कंपनीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून वाशी गावातील ग्रामस्थांसाठी गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबविला आहे. 10 जुलै रोजी तब्बल ५८० नागरिकांना सिलिंडर उपलब्ध करून देण्यात आल्यानंतर आता १२ जुलै रोजी (रविवारीदेखील) उर्वरित नागरिकांना गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती भाजप युवा नेते निशांत भगत यांनी अविरत वाटचालशी बोलताना दिली.

कोरोनाच्या संसर्गाने होत्याचं नव्हतं केले. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी म्हणून महिनों महिने घरात स्वतःला डांबून ठेवले. पोराबाळांची आबाळ होवू लागली तशात मदतीचे हात पुढे आले. डाळ, तांदूळ, तेल घरापर्यंत पोहोचतं केलं गेलं. मात्र अन्न शिजवण्यासाठी लागणारं इंधन घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा मात्र जाणवू लागला. कोरोनाच्या भितीनं झालेल्या लॉकडाउनमध्ये काही भागात सिलिंडर गॅसचा सप्लायच ठप्प पडलेला. अन्न शिजवायचं कसं हा प्रश्न उभा राहिला होता. लॉकडाउनमुळे तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर घरपोच सिलिंडर पोहोचविणे शक्य न झाल्यामुळे अनेकांना गॅस सिलिंडरची चणचण भासू लागली. त्यामुळे दशरथ भगत यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते निशांत भगत, संदीप भगत आणि त्यांच्या युवा सहकाऱ्यांनी वाशी गावातच ग्रामस्थांना गॅस सिलिंडर उपलब्ध करून दिले.

राज्यात पोलीस शिपाई संवर्गातील १० हजार जागा भरणार –
https://bit.ly/2DjZqdV

प्रत्येक गॅस धारकाची योग्य नोंद ठेवत सामाजिक अंतराचे भान राखत सिलिंडर वितरित करण्यात आले. तसेच यावेळी ज्या ज्येष्ठ नागरिक अथवा महिलांना गॅस सिलिंडर घेवून जाणे शक्य होत नव्हते. त्यांच्यासाठी स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली होती. हे स्वयंसेवक स्कूटीवरून महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना घरपोच गॅस सिलिंडर पोहोचवित असल्याचे निशांत भगत यांनी सांगितले.

भाजपची नवीन प्रदेश कार्यकारिणी जाहीर
https://bit.ly/3gnxC6r

१० जुलै रोजी नागरिकांनी मोठ्या संख्येने सिलिंडर प्राप्त केले. मात्र सर्वच नागरिकांना सिलिंडर उपलब्ध व्हावेत यासाठी १२ जुलै रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या काळात परत गॅस सिलिंडर वाशी गाव तसेच आजूबाजूच्या  नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती निशांत भगत यांनी दिली.

======================================================

  • इतर बातम्यांचाही मागोवा