कला शाखेच्या प्रथम वर्षासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

मुंबई, 4 नोव्हेंबर 2020:

कला संचालनालयामार्फत शैक्षणिक वर्ष 2020-21 करिता जी.डी.आर्ट पदविका अभ्यासक्रमांची प्रथम वर्षाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

या अभ्यासक्रमांमध्ये रेखा व रंगकला 4 वर्ष, उपयोजित कला 4 वर्ष, शिल्पकला व प्रतिमानबंध 4 वर्ष, अंतर्गत गृहसजावट 2 वर्ष, वस्त्रकाम (टेक्सटाईल) (प्रिंटीग अँड विविंग) 2 वर्ष, मातकाम (सिरॅमिक व पॉटरी) 2 वर्ष, आणि कला शिक्षणशास्त्र पदविका डिप.ए.एड 1 वर्ष या अभ्यासक्रमांची प्रथम वर्षांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 3 नोव्हेंबरपासून 11 नोव्हेंबरपर्यंत सुरु असणार आहे.

विद्यार्थ्यांनी 3 नोव्हेंबरपासून 10 नोव्हेंबरपर्यंत http://cetcell.net/doa/ या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची तात्पुरती निवड यादी तसेच प्रवेश संबंधीचे पुढील नियोजित तारखा http:/cetcell.net/doa/ तसेच www.doa.org.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येतील असे कला संचालक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.