रुग्णखाटांच्या प्रमाणात मनुष्यबळ वाढविणार

मुंबई, 15 मे 2017/AV News Bureau:

राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये उपलब्ध रुग्णखाटांच्या प्रमाणात अध्यापक वर्ग व विद्यार्थी संख्या वाढविण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. त्याबाबतचा कृती अहवाल तीन महिन्यांत सादर करण्यासही सांगितले आहे.

रुग्ण आणि डॉक्टरांच्या हिताबरोबरच डॉक्टरांच्या सेवा व कर्तव्यामध्ये समतोल साधण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले आहेत. भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या निकषानुसार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांत 1 हजार रुग्णखाटा असल्यास तेथे 200 विद्यार्थी संख्या असे प्रमाण आवश्यक आहे. मात्र राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांची परिस्थिती वेगळी आहे.

विद्यार्थी आणि रुग्णखाटांमधील अधिकची संख्या

  • 200 एमबीबीएस विद्यार्थी संख्या असलेल्या नागपूर सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात 1 हजार 401 रुग्ण खाटा.
  • पुण्याच्या बी. जे. सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांत 1 हजार 296.
  • मुंबईतील ग्रँट शासकीय सरकारी महाविद्यालयात 2 हजार 895 रुग्णखाटा.
  • औरंगाबादच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात 150 विद्यार्थी तर 750 ऐवजी 1 हजार 177 रुग्णखाटा आहेत.
  • धुळे येथील भाऊसाहेब हिरे सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात 100 विद्यार्थी तर 500 ऐवजी 545 रुग्णखाटा आहेत.