पर्यटक तरूणीवर बलात्कार करणा-या रिक्षा चालकाला 12 तासांत अटक

पनवेल पोलिसांची धडक कारवाई

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • पनवेल, 31 डिसेंबर 2020:

छत्तीसगढ येथून मुंबई नाताळ साजरा करण्यासाठी एकट्याच आलेल्या मुलीला जीवे मारण्याची धमकी देवून तिच्यावर बलात्कार करणा-या रिक्षा चालकाला पनवेल शहर पोलिसांनी अवघ्या 12 तासांत अटक केली. सचिन लालताप्रसाद शर्मा (26) असे या रिक्षाचालकाचे नाव असून पनवेल तालुक्यातील बांरवाई गावातून त्याला अटक करण्यात आली आहे तसेच त्याची रिक्षाही ताब्यात घेण्यात आली आहे.

  • 22 डिसेंबर रोजी पश्चिम एक्सप्रेसने ही तरूणी ब्रांद्रा रेल्वेस्थानकात उतरली. तिथल्या टिसीने तिची चौकशी करत तिला चाइल्ड हेल्प लाईनच्या ताब्यात दिले. त्यांनी तिची विचारपूस करून तिला सखी सेंटर या मुलींचे होममध्ये दाखल केले. तिथे तिची चौकशी करून तिला सोडून देण्यात आले. त्यानंतर 27 डिसेंबर रोजी या तरूणीने पनवेल रेल्वे स्थानकातून गांधी गार्डनला जाण्यासाठी एका रिक्षाला हात दाखवला. मात्र रिक्षाचालकाने तिला त्याठिकाणी न नेता वडघर नदीच्या काठी स्माशानभूमीच्या बाजूला असलेल्या झाडीत नेवून तिला धमकावत तिच्यावर बलात्कार केला. तरूणीने यानंतर पनवेल पोलीस शहर ठाणे गाठून घडलेली हकीकत सांगितली.

तातडीने पोलीस आयुक्त बीपीनकुमार सिंह, पोलीस सहआयुक्त डॉ. जय जाधव, अप्पर पोलीस आयुक्त बी.जी. शेखर पाटील, उपआयुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त रविंद्र गिड्डे यांनी गुन्ह्याची उकल करण्याबाबत सूचना केल्या. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मोनाली चौधरी यांनी गुप्त बातमीदारांमार्फत तपास सुरू केला. त्यातून या रिक्षाचालकाबाबत माहिती मिळाली आणि त्याचा जेरबंद करण्यात आले.

  • गुन्ह्याचा तपास करणारे पथक

पनवेल शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक शिंदे, पोलीस उप सहाय्यक पोलीस निरिक्षक सुनिल तारमाळे, पोलीस हवालदार विजय आयरे, वाघमारे, राजू खेडकर, विनोद पाटील, सुनिल गर्दनमारे, यादवराव घुले, पंकज पवार, परेश म्हात्रे, गणेश चौधरी, साळुंखे यांच्या पथकाने ही कारवाई करून आरोपीला गजाआड केले.

=====================================================

  • इतर बातम्यांवरही दृष्टिक्षेप