25 मे रोजी नवी मुंबईचा पाणीपुरवठा बंद

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 24 मे 2021:

मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनी व भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र येथील मान्सुनपूर्व देखभाल व दुरूस्तीची कामे करण्यात येणार असून त्यामुळे भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र येथील पाणी पुरवठा उद्या मंगळवारी 25 मे रोजी बंद राहणार आहे.

त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली या विभागांमध्ये 25 मे  रोजी संध्याकाळी पाणीपुरवठा होणार नाही. तसेच या कालावधीत महानगरपालिका क्षेत्रातील जलवाहिनीवरील थेट नळ जोडण्यांचा व सिडको क्षेत्रातील कामोठे व खारघर नोडमधील नवी मुंबई महानगरपालिकेकडून होणारा पाणी पुरवठा देखील बंद राहील. तसेच बुधवार 26 मे रोजी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.

नागरिकांनी या कालावधीत पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
——————————————————————————————————