अतिवृष्टीच्या शक्यतेमुळे नवी मुंबईतील शाळांना उद्या सुट्टी

प्रातिनिधिक छायाचित्र

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 13  जुलै 2022

अतिवृष्टीची परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा व विद्यालयांना उद्या गुरुवारी १४ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय अतिवृष्टीची परिस्थिती यापुढेही अशीच राहिल्यास शाळेस सुट्टी घेण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापनाला देण्यात आल्याची घोषणा नवी मुंबई महापालिकेच्यावतीने करण्यात आली आहे.

या आदेशाची अंमलबजावणी करण्यास कोणत्याही व्यक्तीने टाळाटाळ केल्यास अथवा विरोध केल्यास संबंधितांच्या विरोधात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम ५१ ते ६० व भारतीय  दंड संहिता, १८६० मधील कलम १८८ नुसार दंडनीय/ कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही महापालिकेने शहरातील सर्व शाळांना कळविले आहे.

==================================================