मराठी पाऊल पडते पुढे नॉनस्टॉप 3500

मुंबई, 25 डिसेंबर 2017/avirat vaatchal news:

मराठी माणसांच्या मनात घर करून असलेला मराठी पाऊल पडते पुढे हा लोक संस्कृतीचा मराठमोळा कलाविष्कार येत्या 28 डिसेंबरला आपला 3500 वा विक्रमी प्रयोग परळच्या दामोदर सभागृहात पार पडणार आहे. marathi paul padhate pudhe

  • गेल्या 26 वर्षात महाराष्ट्रातच नव्हे तर गोवा, गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, दिल्ली आणि हिमाचल प्रदेशात जाऊन आपला मराठी झेंडा फडकावला. एवढेच नव्हे तर गोव्यात 165 प्रयोग करून एक नवा विक्रमही प्रस्थापित केला. नव्वदच्या दशकात मराठी रंगभूमीवर मराठी नाटकांबरोबर मराठी वाद्यवृंद हा एकमेव प्रकार सुरू असताना आपल्या वाद्यवृंदात परंपरा जपणाऱ्या लोकनृत्याची सांगड घातली, अशी माहिती निर्माता-दिग्दर्शक उदय साटम  यांनी दिली.
  •  नव्या पीढीला आपल्या संस्कृतीची माहिती व्हावी, मनात गोडी निर्माण व्हावी म्हणून 3500 व्या प्रयोगानंतरही हा संगीतमय सांस्कृतिक सोहळा असाच सुरू ठेवला जाणार असल्याचे साटम यांनी सांगितले.

***************************************************************************************************************************************************