मध्य रेल्वेचा रविवारी मेगाब्लॉक

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, ७ ऑक्टोबर २०२२

देखभाल आणि दुरूस्तीच्या कामासाठी मध्य रेल्वेने येत्या ९ ऑक्टोबर रोजी म्हणजे रविवारी मेन आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक जाही केला आहे.

ठाणे – कल्याण अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 पर्यंत

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सकाळी 9.30 ते दुपारी 2.45 वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या शेड्यूल थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील आणि निर्धारित वेळेपेक्षा 10 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी  पोहोचतील.

  • कल्याण येथून सकाळी १०.२८ ते दुपारी ३.२५ पर्यंत सुटणाऱ्या अप जलद/अर्ध जलद सेवा कल्याण आणि ठाणे  स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवल्या जाऊन दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर थांबतील त्यानंतर मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील  आणि गंतव्यस्थानावर 10 मिनिटे उशिरा पोहोचेल.

कुर्ला- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत

  • पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ या वेळेत  सुटून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणारी हार्बर मार्गावरील सेवा आणि वाशी/बेलापूर/पनवेल येथून सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ वाजेपर्यंत  सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

  • दरम्यान, ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कुर्ला आणि वाशी -पनवेल स्थानकांदरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. तसेच  ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ट्रान्सहार्बर मार्गे (ठाणे-वाशी/नेरुळ) सकाळी 10.00 ते संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी असेल.