18 वर्षावरील नागरीकांकरिता मोफत प्रिकॉशन डोस देणार

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 14  जुलै 2022

शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात कोव्हिड व्हॅक्सिन अमृत महोत्सव सुरु होत आहे. सदर महोत्सवाच्या जन अभियान अंतर्गत 18 वर्षावरील सर्व नागरिकांना 15 जुलै 2022 ते 30 सप्टेंबर 2022  या 75 दिवसांच्या कालावधीत सर्व शासकिय लसीकरण केंद्रामध्ये प्रिकॉशन डोस मोफत देण्यात येणार आहे. ज्या लाभार्थ्यांना लसीकरणाचा दुसरा डोस घेतल्यानंतर 6 महिने किंवा 26 आठवडे पुर्ण झाले असतील अशा सर्व लाभार्थ्यांना प्रिकॉशन डोस देण्यात येणार येईल.

केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोव्हीड 19 लसीचा दुसरा डोस व प्रिकॉशन डोस यामधील 9 महिने किंवा 39 आठवडे हे अंतर आता कमी करण्यात आले असून दुसरा डोस घेतल्यानंतर 6 महिने किंवा 26 आठवड्यांनी प्रिकॉशन डोस घेता येणार आहे. प्रिकॉशन डोसचा लाभ कालावधी कमी केल्याने आता 3 महिने अगोदर घेता येणार असल्याने कोव्हीड लसीकरणाला अधिक गती मिळणार आहे.

आत्तापर्यंत 13 लाख 81 हजार 281 नागरिकांनी पहिला डोस, 12 लाख 36 हजार 986 नागरिकांनी दुसरा डोस तसेच 1 लाख 1 हजार 317 नागरिकांनी तिसरा म्हणजेच प्रिकॉशन डोस घेतलेला आहे.

कोव्हिड व्हॅक्सिन अमृत महोत्सव अंतर्गत मोफत प्रिकॉशन डोस मिळण्याची सोय नवी मुंबई महानगरपालिकेचे 5 रुग्णालये सा.रु.वाशी, नेरुळ, ऐरोली, व माता बाल रुग्णालय बेलापुर आणि तुर्भे, 23 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे व ESIS रुग्णालयात करण्यात आली आहे.कोव्हिडपासुन लवकरात लवकर संरक्षित करून घेणे गरजेचे असून नागरिकांनी प्रिकॉशन डोसचे मोफत लसीकरण करून घ्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त  अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात आले आहे.