आचारसंहिता भंगाचे 23 गुन्हे दाखल

ठाणे,20फेब्रुवारी 2017/AV News Bureau:

ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या काळात आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी एकूण 23 गुन्हे दाखल करण्यात आले  आहेत

आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी महापालिका मुख्यालयातील आचारसंहिता कक्षाकडे एकूण 42 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामध्ये मालमत्ता विद्रुपीकरणाचे 3 गुन्हे, जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यावर प्रचारबाबत ४,अवैधरित्या धान्य वाटप , विनापरवाना मंडप, विनापरवाना प्रचार मिरवणूक आणि सोशल मीडियावरून धार्मिक भावना भडकवणारा मजकूर प्रसारित करणे याबाबत प्रत्येकी १ गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

राज्य निवडणूक आयोगामार्फत विकसित करण्यात आलेल्या Citizen On Patrol (COP)  अॅपवर  २१ तक्रारी दाखल झाल्या आहेत .तसेच whatsapp group वर ५ तक्रारी  दाखल झाल्या आहेत.  या सर्वांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे ठाणे पालिका आयुक्त आणि निवडणूक निर्णय अधिकारी संजय जयस्वाल यांनी सांगितले.