आपच्या पदाधिका-यांनी घेतली महापालिका आयुक्तांची भेट

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 19 ऑक्टोबर  2022:

टीम आप नवी मुंबईच्या वतीने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांची भेट घेण्यात आली. या भेटीमध्ये आयुक्त नार्वेकर यांची महापालिका आयुक्तपदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. टीम आप नवी मुंबईने आयुक्त नार्वेकर यांना महापालिका प्रशासनाकडून करण्यात येणा-या नागरी कामांसाठी नेहमीच सकारात्मक आणि सहकार्याची भूमिका असेल असा विश्वास देण्यात आला.

  • यावेळी आपचे नवी मुंबई अध्यक्ष श्यामभाऊ कदम, उपाध्यक्ष प्रिती शिंदेकर, ठाणे जिल्हा युवा संघटक चिन्मय गोडे,  पदाधिकारी डॉ विलास उजागरे,  देवराम सुर्यवंशी, नीना जोहरी, स्नेहा उजागरे,  अभिषेक पांडे, आरती सोनवणे, विजया सुर्यवंशी, धनवंती बच्चन आदि उपस्थित होते.

सामान्य नागरिकांकडून आलेल्या तक्रारी प्रथम प्रभाग स्तरावरील विभाग अधिकारी, विभाग स्तरावर सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल. पण या तक्रारींना योग्य न्याय न मिळाल्यास आयुक्तांसमोर या समस्या, तक्रारी मांडण्यात येतील असही यावेळी आपच्या वतीने सांगण्यात आले.

—————————————————————————————————–