नेरुळच्या पंडित रामा भगत उद्यानात ओपन जिम सुरू करा

  • नवी मुंबई काँग्रेस सचिव विरेंद्र म्हात्रे यांची मागणी
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
नवी मुंबई , 30 मे 2019:

नेरुळ सेक्टर 12 मधील कै. पंडित रामा भगत उद्यानात नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीने एक ओपन जिम सुरू करावी, अशी मागणी नवी मुंबई काँग्रेसचे सचिव विरेंद्र यशवंत म्हात्रे यांनी केली आहे. नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांना याविषयीचे निवेदन म्हात्रे यांनी दिले आहे.

  • नेरुळ सेक्टर 12 मधील भगत उद्यानात सकाळी आणि संध्याकाळी मोठया प्रमाणात नागरिक येत असतात. त्यामुळे या उद्यानात व्यायामासाठी ओपन जिम सुरू करावी, अशी मागणी  नागरिकांकडून होत होती. याप्रकरणी काही नागरिकांनी विरेंद्र म्हात्रे यांची भेट घेवून उद्यानात ओपन जिम सुरू करण्याबाबत पुढाकार घेण्याची विनंती केली. त्यानुसार विरेंद्र म्हात्रे यांनी त्वरीत महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांची भेट घेतली आणि भगत उद्यानात नागरिकांच्या आरोग्यासाठी ओपन जिम त्वरीत सुरू करण्याबाबत विनंती करणारे निवेदन दिले. आयुक्त रामास्वामी यांनी लवकरच या उद्यानात ओपन जिम सुरू करण्यात येईल, असे आश्वासन नवी मुंबई काँग्रेसचे सचिव विरेंद्र म्हात्रे यांना दिले आहे.

=========================================

इतर बातम्यांचाही मागोवा