शुक्रवारी ठाण्यात पाणी पुरवठा नाही

स्टेमची जलवाहिनी आणि मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी शट डाऊन

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • ठाणे, 25 मे 2023

 स्टेम प्राधिकरणाच्या जल वाहिनीची देखभाल दुरुस्ती आणि ठाणे महापालिकेच्या जल वाहिनीची साकेत पुलावरील दुरुस्ती या कामांमुळे शुक्रवार  २६ मे रोजी सकाळी ९.०० ते शनिवार २७ मे रोजी सकाळी ९.०० वाजेपर्यंत असा २४ तासांकरता ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

स्टेम प्राधिकरणाच्या जल वाहिनीची देखभाल, दुरुस्ती यांची कामे या अवधीत केली जाणार आहेत. तसेच, ठाणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जल वाहिनीची साकेत पूल येथे दुरुस्ती तसेच व्हॉल्व बदलेले जाणार आहेत. या कामांसाठी हा २४ तासांचा शट डाऊन घेण्यात येणार आहे.

या काळात घोडबंदर रोड, लोकमान्य नगर, वर्तक नगर, साकेत, ऋतू पार्क, कारागृह परिसर, गांधी नगर, रुस्तमजी, इंदिरा नगर, रुपादेवी, श्रीनगर, समता नगर, सिध्देश्वर, इटरनिटी, जॉन्सन, मुंब्रा आणि कळवा या भागातील पाणी पुरवठा शुक्रवार  २६ मे रोजी सकाळी ९.०० ते शनिवार  २७ मे रोजी सकाळी ९.०० वाजेपर्यंत बंद राहील. तसेच, पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल.

गुरूवारी कोपरीत पाणी नाही

कोपरी येथील ठाणे महापालिकेच्या धोबीघाट जलकुंभाची ५०० मीमी व्यासाची मुख्य जलवितरण वाहिनी विकास कामात वाधित असल्याने स्थलांतरीत करण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी क्रॉस कनेक्शन घेण्यात येणार असल्याने गुरूवार,  २५ मे सकाळी ९.०० पासून ते शुक्रवार  २६ मे रोजी सकाळी ९.०० पर्यंत २४ तासांसाठी कोपरी परिसरातील धोबीघाट व कन्हैयानगर जलकुंभावरुन होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच, पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल.

========================================================

अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL

========================================================

अविरत वाटचाल वर्तमानपत्र