घरफोडीच्या गुन्ह्यातील दोघांना अटक, 7 लाख 30 हजाराचे दागिने, रोख जप्त

पोलीस आयुक्त मिलिंद भारंबेंच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई पोलिसांची कामगिरी

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 15 मार्च 2023

नवी मुंबई पोलिसांच्या कक्ष 3 गुन्हे शाखेकडून घरफोडीच्या गुन्हयातील दोन आरोपींना  अटक करून त्यांच्याकडून रोख रक्कम व सोन्याचे दागीने असा एकुण 7 लाख 30 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे तसेच सहपोलीस आयुक्त संजय मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली 10 मार्च रोजी या गुन्ह्याचा तपास करून आरोपींच्या मुसक्य़ा आवळण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले आहे.

तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1 मार्च रोजी फिर्यादी रामदास पाटील रा. नितळस गाव, तळोजा यांच्या राहत्या घरी अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सुमारे रोख  रक्कम व सोन्याचे गंठण असा एकुण 7 लाख 30 हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला होता. प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेवून पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सह पोलीस आयुक्त संजय मोहिते अपर पोलीस आयुक्त महेश घुर्ये यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक वस्त यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरु करण्यात आला. त्यानंतर  फिर्यादी व साक्षीदार यांच्याकडे मिळालेल्या माहितीच्या आधारे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून तसेच मिळालेल्या माहितीवरून कक्ष ३ गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर या परिसरात आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. तपासाअंती 10 मार्च रोजी आरोपी सुमित भगवान शेळके (24) राहणार गांधीपाडा अलिबाग, सध्या रा. लक्ष्मी कसबे चाळ, बैल बाजार सहयोग नगर वाडिया ईस्टेट जवळ कुर्ला पश्चीम, मुंबई आणि श्रीनाथ सदाशिव वाघमारे (25)राहणार  महेंद्ररंगी शिवचल्लेश्वर मंदिराचे बाजुला ता. अक्कलकोट जि. सोलापुर सध्या रा. शहिद भगतसिंग नगर, रेल्वे गेट ५ वडाळा पूर्व, मुंबई यांना अटक केली. दोन्ही आरोपींनी गुन्हा कबूल केला आहे. या आरोपींकडून 4 लाख 30 हजार रुपये रोख रक्कम, 2 लाख 80 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण, 2 मोबाइल असा तबब्ल 7 लाख 30 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. अटक करण्यात आलेले आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ कोळेकर, सपोनि ईशान खरोटे, सपोनि सागर पवार, पोउपनि  सुशील मोरे, अंमलदार पोलीस हवालदार मोरे, पोलीस हवालदार बावा, पोलीस हवालदार पवार, पाटील (तांत्रीक तपास) धनवटे, जेजुरकर, बोरसे, जोशी, पोलीस नाईक मोरे, सोनवलकर याच्या पथकाने केला.

========================================================

अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL

========================================================

  • अविरत वाटचाल वर्तमानपत्र