खारघर व्हॅली गोल्फ कोर्स येथे वृक्षारोपण कार्यक्रम साजरा

सिडकोच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांच्या हस्ते करण्यात आले वृक्षारोपण

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 7 जुलै 2023

खारघर व्हॅली गोल्फ कोर्स येथे  सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर,यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येऊन या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. नवी मुंबईमध्ये विविध ठिकाणी मिळून 40 हजार इतक्या विक्रमी संख्येने वृक्षांची लागवड करण्याचे सिडकोचे लक्ष्य आहे.

 

वृक्षारोपणाचा कार्यक्रम  सहव्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील, सहव्यवस्थापकीय संचालक शांन्तनु गोयल,  सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. कैलास शिंदे आणि इतर अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या प्रसंगी सिडकोतील विभाग प्रमुख, अधिकारी – कर्मचारी व कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वृक्षारोपण उपक्रमांतर्गत नवी मुंबईतील खारघर, कामोठे, नावडे, उलवे, द्रोणागिरी इ. नोडमध्ये सुरू, कांचन, ताम्हण, कडुलिंब, बहावा, करंज, कदंब, बकुळ, सिता अशोक, पुत्रंजिवा, वड, पिंपळ, उंबर इ. प्रजातींच्या 40 हजार वृक्षांची लागवड सिडकोतर्फे करण्यात येणार आहे.

========================================================

========================================================