पाणी साचणा-या ठिकाणी कायमस्वरुपी तोडगा काढणार

  • ठाण्यात नगर अभियंत्याच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत

अविरत वाटचाल न्यूज

ठाणे, 25 जून 2018:

शहरात ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचते अशा ठिकाणांचा अभ्यास करुन या ठिकाणी कायमस्वरुपी तोड़गा काढ़ण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करा, असे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. महापालिका आयुक्तांच्या आदेशानंतर नगर अभियंता अनिल पाटील यांच्या अधयक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली आहे.

पाणी साचणारी 13 ठिकाणे निश्चित

ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात पाणी साचणारी एकूण 13 ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. त्यामध्ये नौपाड़ा प्रभाग समिती अंतर्गत ठामपा प्रशासकीय भवना जवळ डॉ. अल्मेडा रोड येथील डेबोनार सोसायटी, वंदना सिनेमाजवळ लाल बहादुर शास्त्री मार्ग, राम मारुती रोड येथील गजानन महाराज मंदिर व गडकरी पथ चौक, गोखले रोड येथील देवधर हॉस्पिटल, जिजामाता मंडई जवळ मासुंदा तलाव शिवाजी पथ, एम.जी.रोड येथील पंपिंग स्टेशन-चिखलवाडी, एल.बी.एस. मार्ग येथील चव्हाण चाळ, उथळसर प्रभाग समिती अंतर्गत वृंदावन सोसायटी तसेच श्रीरंग सोसायटी, माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत घोडबंदर रोड येथील पंचामृत सोसायटी जवळ रिलायन्स फ्रेश, घोडबंदर रोड येथील आय.सी.आय.सी.आय. बँके जवळ, कळवा प्रभाग समिती येथील विटावा रेल्वे पुलाखाली बेलापूर रस्ता, तर मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत दिवा गांव आदी ठिकाणांचा समावेश आहे.

  • या ठिकाणी कायमस्वरुपी काय तोडगा काढता येईल याबाबत नगर अभियंता यांनी अभ्यास करुन या ठिकाणी कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याचा अहवाल महापालिका आयुक्तांना सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

==========================================================================================

इतर बातम्यांचाही मागोवा 

  • हातमागावरील साड्यांना नवसंजीवनी …