दोन्ही हातांनी दिव्यांग मुलाला उपचारांसाठी मुख्यमंत्र्यांची ५ लाखांची मदत

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 8 जुलै 2023

नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या आणि दोन्ही हात नसतानाही दिव्यांगावर मात करीत सर्वसामान्य मुलांप्रमाणे शिक्षण घेणाऱ्या इयत्ता तिसरीतील विद्यार्थ्याच्या जिद्दीला सलाम करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याच्या पुढील उपचारांसाठी पाच लाख रुपयांचा धनादेश दिला.

अनंत आमची ध्येयासक्ती
अनंत अन आशा
किनारा तुला पामराला..
कवी कुसुमाग्रज्यांच्या या ओळी मला आठवल्या,, कारण नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील असलोद येथील तिसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या गणेश माळी या चिमुकल्याने ७ जुलै रोजी वर्षा या निवासस्थानी येऊन माझी भेट घेतली. त्याला भेटून त्याची शिक्षणाप्रती आवड आणि जिद्द बघायला मिळाली. पायाच्या बोटात पेन धरून तो जिद्दीने लिखाण करतो. . तसेच जेवणे, कपडे परिधान हेही काम गणेश पायांनी करतो अशी माहिती गणेशचे वडील विलास माळी यांनी दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी गणेशच्या या जिद्दीचे कौतुक करून त्याला पुढील उपचारासाठी ५ लाख रुपयांचा धनादेश दिला. तसेच त्याच्या पुढील वाटचालीत आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता विभागाचे प्रमुख मंगेश चिवटे आणि उपस्थित होते.

========================================================

========================================================