नमुंमपा सारसोळे सीबीएसई शाळेतील नर्सरीच्या वर्गासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, १७ जुलै २०२३

नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागामार्फत सारसोळे गांवात नवीन सी.बी.एस.ई. बोर्डाची शाळा सुरु करण्यात येत असून तेथे सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात नर्सरी, ज्युनिअर के.जी., सिनिअर के.जी. तसेच इयत्ता पहिलीच्या वर्गाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे. हे प्रवेश पूर्णपणे नि:शुल्क असल्यामुळे या सुविधेचा लाभ जास्तीत जास्त पालकांनी घ्यावा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

  1. या प्रवेशामध्ये नर्सरीच्या प्रवेशासाठी 1 जुलै 2019 ते 31 डिसेबर 2020 या कालावधीतील वयोमर्यादा ग्राह्य धरण्यात येत असून 31 डिसेंबर 2023 रोजी किमान वय 3 वर्ष व कमाल वय 4 वर्ष 5 महिने 30 दिवस असणे आवश्यक आहे.
  2. ज्युनिअर के.जी. वर्गातील प्रवेशासाठी 1 जुलै 2018 ते 31 डिसेबर 2019 या कालावधीतील वयोमर्यादा ग्राह्य धरण्यात येत असून 31 डिसेंबर 2023 रोजी किमान वय 4 वर्ष व कमाल वय 5 वर्ष 5 महिने 30 दिवस असणे आवश्यक आहे.
  3. सिनिअर के.जी. वर्गातील प्रवेशासाठी 1 जुलै 2017 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीतील वयोमर्यादा ग्राह्य धरण्यात येत असून 31 डिसेंबर 2023 रोजी किमान वय 5 वर्ष व कमाल वय 6  वर्ष 5 महिने 30 दिवस असणे आवश्यक आहे.
  4. १ ली च्या वर्गातील प्रवेशासाठी 1 जुलै 2016 ते 31 डिसेंबर 2017 या कालावधीतील  वयोमर्यादा ग्राह्य धरण्यात येत असून 31 डिसेंबर 2023 रोजी किमान वय 6 वर्ष व कमाल वय 7 वर्ष 5 महिने 30 दिवस असणे आवश्यक आहे.

या चारही वर्गांकरिता प्रती वर्ग 30 विदयार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असून प्रवेश घेण्यासाठी पाल्याचा जन्मदाखला, जातीचा दाखला, पासपोर्ट साईझ फोटो, आधारकार्ड व वडिलांचा रहिवासी पुरावा ही कागदपत्रे  आवश्यक आहेत.

प्रवेशासाठीचे अर्ज सारसोळे शाळेमध्ये 25 जुलै 2023 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत नि:शुल्क उपलब्ध आहेत. हे अर्ज पालकांनी पूर्णपणे भरून आवश्यक कागदपत्रांसह 26 जुलै 2023 रोजी शाळेत सदर करणे आवश्यक आहे.

शाळेत प्रवेश देतांना शाळेपासून 1 कि.मी अंतराच्या आत राहणाऱ्या विदयार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल. प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त अर्ज असल्यास लॉटरी पद्धतीचा अवलंब केला जाईल. शाळेतील शिक्षण नि:शुल्क असून बससेवा उपलब्ध असणार नाही याची पालकांनी नोंद घ्यावयाची आहे. अर्ज भरताना ज्या वर्गातील प्रवेशासाठी अर्ज भरला आहे त्याकरिता 31 डिसेंबर 2023 रोजी अटींमध्ये नमूद केलेले वय पूर्ण असणे आवश्यक आहे.

========================================================

========================================================