मेन आणि हार्बरवर  उद्या (15 ऑक्टोबर) मेगाब्लॉक

मुंबई, 14 ऑक्टोबर 2017/AV News Bureau:

रेल्वे रुळांची देखभाल तसेच ओव्हरहेड वायरच्या दुरूस्ती आणि देखभालीच्या कामासाठी मध्य रेल्वेतर्फे मेन आणि हार्बर मार्गावर उद्या, १५ ऑक्टोबर रोजी मेगाब्लॉक जाहीर करण्यात आल्या आहेत. यामुळे मेन आणि हार्बर मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. mega block on main and harbour line

 

कल्याणठाणे अप धीम्‍या मार्गावर सकाळी 11.15 वाजल्‍या पासून दुपारी 4.15 वाजेपर्यंत

  •  सकाळी 10.47 वाजल्‍या पासून दुपारी 4.14 वाजे पर्यंत कल्याणहून सुटणा-या अप धीम्‍या तसेच अर्ध जलद मार्गाच्‍या सेवा कल्याण व मुलुंड स्‍थानका दरम्‍यान अप जलद मार्गावर चालवण्‍यात येईल आणि मुलुंड स्‍थानका पासून आपल्‍या निर्धारित अप धीम्‍या मार्गावर चालवण्‍यात येईल.

 

  • अप धीम्‍या मार्गाची सेवा ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा आणि कळवा स्‍थानकासाठी उपलब्‍ध राहणार नाही. मात्र या स्थानकांवरील प्रवाशांना ठाणे, दिवा, डोंबिवली आणि कल्‍याण स्‍थानकातून प्रवास करण्‍याची मुभा देण्‍यात आली आहे.

 

  • सकाळी 10.08 पासून दुपारी 2.42 वाजेपर्यंत छत्र‍पति शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटणा-या सर्व डाऊन जलद मार्गाच्‍या गाड्या नेहमीच्या थांब्‍याव्‍यतिरिक्‍त विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा स्‍थानकावर थांबतील आणि १५ मिनिटे उशिराने धावतील .

 

  • सकाळी 10.28 पासून दुपारी 3.08 वाजेपर्यंत कल्‍याणहून सुटणा-या अप जलद मार्गांवरील गाड्या नेहमीच्या थांब्यांव्यतिरिक्त दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला स्‍थानकावर थांबेल. या गाड्या 15 मिनटे उशीराने धावतील.

नेरूळ-मानखुर्द अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.20 वाजल्‍या पासून दुपारी 4.20 वाजेपर्यंत

  •  सकाळी 10.18 वाजल्‍या पासून दुपारी 3.39 पर्यंत छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनसहून पनवेल/ बेलापुर/वाशीसाठी सुटणा-या सर्व गाड्या आणि सकाळी 10.52 पासून सायंकाळी 4.12 वाजेपर्यंत पनवेल/बेलापुर/वाशी येथून छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस करीता सुटणा-या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

 

  • मेगाब्लॉकच्या काळात छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस ते मानखुर्द आणि ठाणे ते पनवेल मार्गावर विशेष गाड्या चालविण्‍यात येतील.

 

  • हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 ते सायंकाळी 4 या काळात ट्रान्सहार्बर आणि मेन लाइनवरून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

mega block on main and harbour line