खारघर येथे एनएमएमटी बसला आग; सुदैवाने जिवितहानी नाही

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
    नवी मुंबई, 6 सप्टेंबर 2023

नवी मुंबई महानगरपालिकापरिवहन अर्थात एनएमटीच्या बसला आज सकाळी साडेअकराच्या सुमारास आग लागली. या दुर्घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही. मात्र आगीमुळे बसचे नुकसान झाले आहे.

खारघर जलवायू विहार इथून 53 क्रमांकाची ही बस खारघर रेल्वे स्थानक या मार्गावर जात होती. साडेअकराच्या सुमारास खारघर घरकुलजवळ या बसने पेट घेतला. प्रसंगावधान राखत बसमधील15 प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. त्यामुळे जिवितहानी झाली नाही. मात्र संपूर्ण बस जळाली आहे. शॉर्ट सर्किट होऊन ही आग लागली असावी अशी शक्यता एनएमटीच्या अधिका-यांनी व्यक्त केली.

दरम्यान, या दुर्घटनेची अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

========================================================

========================================================