शुक्रवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • ठाणे, 6 सप्टेंबर 2023

ठाणे महानगरपालिकेच्या स्वत:च्या योजनेचा व मे. स्टेम प्राधिकरणाकडून  शुक्रवार 8 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते शनिवारी 9 सप्टेंबर सकाळी 9  पर्यंत 24 तासांचा शटडाऊन घेवून देखभाल व दुरुस्तीची तातडीची कामे करण्यात येणार आहे. त्यामुळे शुक्रवारी ठाण्यातील काही भागांमध्ये पाणी पुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याचे ठाणे महापालिका प्रशासनाने जाहीर केले आहे .

या शटडाऊन कालावधीत शहरातील घोडबंदर रोड, लोकमान्यनगर, वर्तकनगर, साकेत, ऋतूपार्क, जेल, गांधीनगर, रुस्तमजी, इंदिरानगर, रुपादेवी, श्रीनगर, समतानगर, सिध्देश्वर, इटरनिटी, जॉन्सन, मुंब्रा व कळव्याच्या काही भागातील पाणीपुरवठा 24 तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे.

वरील शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा व ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

========================================================