शेकडो रिपाई कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई29 सप्टेंबर 2023

काँग्रेस पक्षाचे मुख्यालय टिळक भवन येथे रायगड जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे युवा नेते अमेय मोहिते यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे रायगड जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या सर्वांचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सर्वांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले.

काँग्रेस पक्षात प्रवेश घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काँग्रेस पक्षच सर्वांना बरोबर घेऊन जाऊ शकतोसर्व जाती धर्मांच्या लोकांना न्याय मिळवून देऊ शकतो हा विश्वास दृढ होत आहे. राहुलजी गांधीमल्लिकार्जूनजी खर्गे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून इतर पक्षातील असंख्य नेतेपदाधिकारी व कार्यकर्ते काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेतअसे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

बातमी वाचा : Navi Mumbai Morbe Dam: जलपूजनाचा वाद चिघळला

रिपब्लिकन पार्टीचे उलवेचे अध्यक्ष महेश जंगलेअमित पवारराम पवारमहेंद्र मोहितेराजू मनवरश्याम गुडदेरघुनाथ भगतदिनेश वाघमारेसंजय गावंडलक्ष्मण चौगुलेसंदीप भालेरावदिपक पट्टेबादूरविलास कांबळेसंतोष सरकटेदत्तात्रय करेमारोती जाधवकविता झटातेसविता काळेपलक काळेपरिनिती झटालेशुभांगी नकटेकाजल रावतकलावती कौरनिशा मोरेकृष्णा कौरमाधुरी जैस्वालनिशा राठोडसमशिदा शेखप्रियंका राठोड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

========================================================

========================================================