7 जानेवारीला कोपरखैरणे से.11 येथे ‘वॉक विथ कमिशनर’

नवी मुंबई, 6 जानेवारी 17/AV News Bureau:

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे  यांचा ‘वॉक विथ कमिशनर’ हा कार्यक्रम 7 जानेवारी कोपरखैरणे, सेक्टर 11 येथे आयोजित करण्यात आला आहे. सकाळी 6.30 वाजता प्लॉट नं. 34, शुभम् अटलांटिस जवळ महापालिका अधिका-यांसह उपस्थित राहून आयुक्त नागरिकांशी संवाद साधणार आहेत.

ज्या नागरिकांना तक्रारी वा सूचना करायच्या आहेत. त्यांनी त्या लेखी स्वरूपात सोबत घेऊन याव्यात. तसेच त्याठिकाणी सकाळी 6 वाजल्यापासून उपस्थित असणा-या महापालिका विभाग कार्यालय प्रतिनिधीकडून आपला टोकन क्रमांक घ्यावा. त्यानंतर टोकन क्रमांकानुसार आयुक्तांना  आपले निवेदन सादर करावे असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.