नवी मुंबईत नागरिकांना घराजवळच भाजीपाला उपलब्ध करून देणार

नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची घोषणा

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, २६ मार्च २०२०

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशव्यापी संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. याकाळात जीवनावश्यक सेवा सुरळीतपणे सुरु ठेवण्यासाठी महानगरपालिका प्रशासन संपूर्णपणे खबरदारी घेत आहे. कोरोना हा संसर्गातून पसरणारा आजार असल्याने भाजीपाला घेण्यासाठी नागरिकांची भाजी मंडईमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी चौकाचौकामध्ये हातगाडी, छोटे टेम्पो अथवा गाडीच्या माध्यमातून भाजीपाला व फळे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने नागरिकांनी भाजी मंडईमध्ये गर्दी करू नये असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी केले आहे.

  • नागरिक बाजारामध्ये तसेच भाजी मंडईत गर्दी करताना दिसत आहेत. त्यामुळे संचारबंदीचे उल्लंघन होत आहे. भाजी मंडईमध्ये नागरिकांनी गर्दी करू नये यासाठी भाजीपाला, फळे नागरिकांना घराजवळ मिळण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने किरकोळ हातगाडी विक्रेता / टेम्पोधारक यांचेमार्फत चौका-चौकामध्ये तसेच गृहनिर्माण संस्थांच्या परीसरात भाजीपाला व फळे रास्त भावात उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत.

एपीएमसी प्रायोगिक तत्वावर सुरू
https://bit.ly/33OldTW

याकरीता आठही विभाग अधिकाऱी यांचेमार्फत विभागनिहाय भाजीपाला व फळे विक्रेता टेम्पो धारकाची नावे, टेम्पो क्रमांक व मोबाईल क्रमांक नवी मुंबई महानगरपालिकेच्या संकेत स्थळ https://www.nmmc.gov.in/ (वेबसाईट) प्रसिध्द करण्यात येत आहे. नागरिकांनी व संस्थेच्या पदाधिकारांनी या विक्रेत्यांशी संपर्क साधून आपल्या परिसरात भाजीपाला व फळे विक्रीकरीता दिनांक व वेळ निश्चित करून घ्यावी. तसेच किरकोळ विक्रेत्यांनी देखील मंडईमध्ये एकाच वेळी गर्दी करू नये, याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

कोरोना : मुंबईतील महिलेचा वाशी येथील रुग्णालयात मृत्यू
https://bit.ly/39kSasD

  • या भाजी विक्रेत्यांनी सुरक्षेचे सर्व नियम पाळणे आवश्यक असून मास्क, हातमोजे, तसेच सॅनिटायझरचा वापर करणे गरजेचे आहे. नागरिकांनी भाजीपाल्याचा पुरवठा सुरू आहे याची कृपया नोंद घ्यावी व अफवांवर विश्वास ठेवू नये आणि गर्दी करु नये असेही आवाहन महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे .

पहिली ते आठवींपर्यन्त परीक्षा रद्द
https://bit.ly/2U5Jnq1

या काळात किराणा मालाची दुकानेही नियमितपणे सुरु राहणार आहेत. बाजारपेठेत मुबलक साठा शिल्लक आहे. नागरिकांनी उगाचच घाबरून जाऊन साठा करून ठेवू नये. सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी किरकोळ दुकानदार, व्यापारी यांनी नागरिकांना घरपोच किराणा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करावे तसेच नागरिकांनी थेट दुकानात जाऊन खरेदी करण्यापेक्षा आवश्यक सामानाची यादी तयार करून पाठवावी व दुकानदाराने दिलेल्या वेळी जाऊन सामानाची उचल करावी असे सूचित करण्यात आले आहे. तरी नागरिकांनी जितक्या प्रमाणात गर्दी टाळणे शक्य आहे तेवढी गर्दी टाळावी व अत्यावश्यक साहित्य खरेदीसाठी घराबाहेर आल्यानंतर दोन व्यक्तींमध्ये 3 फुटाइतके सुरक्षित अंतर राखावे व नागरिकांच्याच आरोग्य हितासाठी नियम पाळून सहकार्य करावे असे न्रम आवाहन महापालिका आयुक्त मिसाळ यांनी केले आहे.

=======================================================

  • इतर बातम्यांचाही मागोवा