नाटकातला प्रत्येक शब्द लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे

97 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर यांचे मत

पनवेल, 9 जानेवारी 2017/AV News Bureau:

नाटकातला प्रत्येक शब्द लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. त्यासाठी भाषेवर विशेष लक्ष द्या, असे मत  97 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर यांनी पनवेल येथे व्यक्त केले. अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा आणि चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई व कोकण विभागस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीचा पारितोषिक वितरण समारंभ गेल्या रविवारी पनवेलच्या फडके नाट्यगृहात पार पडला. यावेळी 97 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जयंत सावरकर यांचा पनवेलकरांच्यावतीने सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला लेखक व समीक्षक प्रा. नितीन आरेकर, दिग्दर्शक मंहेंद्र तेरेदेसाई, अभिनेते भरत सावले, जयवंत वाडकर, समीर खांडेकर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.