नवी मुंबईतून मेथाफेटामाईनची पावडर जप्त

अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

नवी मुंबई, 12 जानेवारी 17/ AV News Bureau:

सीबीडी परिसरामध्ये एमडी पावडरची( मेथाफेटामाईन) विक्री करण्यासाठी आलेल्या एका तरूणाला अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडे प्लास्टिक पिशवीत 53 ग्रॅम वजनाची 1 लाख 70 हजार  रूपये किमतीची एमडी पावडर आढळून आली आहे. या तरूणाला ताब्यात घेऊन त्याच्यावर अमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

10 जानेवारी रोजी एक तरूण मेथाफेटामाईन पावडरची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती या पथकाला मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला होता. त्यावेळी  बिलाल उर्फ सलमान अब्दुल रज्जाक पटेल हा संशयितरित्या फिरत असल्याचे आढळून आले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 53 ग्रॅम वजनाची मेथाफेटामाईन पावडर आढळून आली. याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.