लाच मागणाऱ्या तलाठ्याला अटक

पालघर,12 जून2017/AV News Bureau:

जमिनीच्या मोजणीसाठी 7/12 उतारे आणि चौफेर नकाशे देण्यासाठी ४ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या पालघर येथील तलाठ्याला ठाणे लाचचुलचपत प्रतिबंध विभागाने आज सापळा रचून अटक केली. अंकीत अशोक राठोड (21 वय) असे लाच मागणाऱ्या तलाठ्याचे नाव असून तो डहाणू येथील सरवली मंडळ कार्यालयात कार्यरत आहे.

तक्रारदार यांच्या सासऱ्याच्या जमिनीची मोजणी करायची होती. त्यासाठी 7/12 उतारे आणि चौफेर नकाशे मिळावेत यासाठी सरवली कार्यालयात अर्ज केला होती. ही कागदपत्रे देण्यासाठी तलाठी अंकीत अशोक राठोड याने 10 हजार रुपयांची लाच मागितली होती. मात्र तडजोडीअंती लाचेची रक्कम 4 हजार रुपये इतकी ठरली. याप्रकरणी तक्रारदार याने ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली. पडताळणी केली असता तक्रार खरी असल्याचे आढळून आले. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी कार्यालयातच सापळा रचून 4 हजार रुपये तक्रारदाराकडून स्वीकारताना तलाठी अंकीत अशोक राठोड (21) याला रंगेहाथ पकडण्यात आले. अंकीत अशोक राठोड (21) या सरवली येथील तलाठ्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबध अधिनियम 1988 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पोलीस निरीक्षक आजगावकर अधिक तपास करीत आहेत.