वाशीतील काही भागात उद्या वीज नाही

 

नवी मुंबई, 12 जानेवारी 17 / AV News Bureau :

नवी मुंबईच्या वाशी विभागातील वीज वाहिनीच्या दुरूस्तीचं काम उद्या करण्यात येणार आहे. त्यामुळे वाशीतील काही भागाचा वीजपुरवठा सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत  बंद राहणार आहे.

महावितरणच्या 22 के.व्ही. जयसंथ या वीज वाहिनीवरून क्वारीचा भाग, गणपतीपाडा, इग्लू डेरी आदी परिसर आणि 22 के. व्ही. सावळा कोल्ड स्टोरेज या वीज वाहिनीवरील सानपाडा भाग, एम.जी. नगर, अलाना ग्रुप आणि कुकशेत भाग आदी परिसराचा वीजपुरवठा सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत बंद राहणार असल्याचे महावितरणने कळविले आहे.