लॉकडाउन अपडेट्स: सर्व डिपार्टमेंटल स्टोअर्सना जीवनावश्यक वस्तूंच्या केवळ होम डिलिव्हरीची परवानगी

  • वाशीच्या सेंटरवन मॉलमधील सेंट्रल दुकानासासह इतर विभागांत 6 दुकानदारांवर लॉकडाऊन उल्लंघनाचे गुन्हे दाखल
  • ३ दिवसांत २ लाख २२ हजार ८०० इतकी दंडात्मक रक्कम वसूल
  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई,७ जुलै २०२०

नवी मुंबईत लॉकडाउनच्या काळात अनेक नागरिक अत्यावश्यक वस्तू खरेदीच्या बहाण्याने घराबाहेर पडत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे महापालिका व पोलीस प्रशासन यावर नाहक ताण येत आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दिलेल्या आदेशानुसार लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करण्याच्या अनुषंगाने वाशी येथील सेंटरवन मॉल मधील वाशी सेंट्रल दुकानात इतर विभागातील दुकानांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच लॉकडाउनच्या काळात डी मार्ट, रिलायन्स फ्रेशसह सर्व डिपार्टमेंटंल स्टोअर्सना जीवनावश्यक वस्तूंच्या केवळ होम डिलिव्हरीची परवानगी देण्यात आल्याचेही महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

याशिवाय मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्सींग न पाळणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे अशा अत्यंत महत्वाच्या गोष्टींचे पालन न करणाऱ्या नागरिक / दुकानदार यांच्याकडून ४ ते ६ जुलै दरम्यान २ लाख २२ हजार ८०० इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे.

अविरत वाटचाल: पेज लाइक करा. शेअर करा. कमेंट करा.
फीसाठी दबाव टाकल्यास शाळांवर कठोर कारवाई
https://bit.ly/2YtAZS3

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊन कालावधीत नागरिकांनी घरातच थांबावे तसेच अगदी गरजेचे असेल तरच जीवनावश्यक बाबीसाठी घरातल्या एखादयाच व्यक्तीने बाहेर यावे व आपले काम झाल्यावर लगेच घरी परतावे. मास्कचा वापर करावा व सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे असे आवाहन करतानाच महापालिका आयुक्त मिसाळ यांनी हा लॉकडाऊन कालावधी कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी अत्यंत महत्वाचा असून सर्वांच्याच आरोग्य हिताच्या दृष्टीने गरजेचा आहे हे लक्षात घेऊन नागरिकांनी संपूर्ण सहकार्य करावे व लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करुन कायदेशीर कारवाईची वेळ येऊ देऊ नये असे आवाहन केले आहे.

==============================================

  • इतर बातम्यांचाही मागोवा