अल्फोन्स सिम्बू, बोर्नेस किटुर मॅरेथॉन विजेते

मुंबई,15 जानेवारी 2017/AV News Bureau :

मुंबई महापालिका प्रशासनाने शुल्क वसूलीसाठी पाठविलेल्या नोटिसीमुळे वादात सापडलेली मुंबई मॅरेथॉन स्पर्धा अखेर निर्विघ्न पार पडली. टांझानियाच्या अल्फोन्स सिम्बू आणि केनियाच्या बोर्नेस किटुर यांनी अनुक्रमे पुरुष आणि महिला गटाचे विजेते पद पटकावले.  42 किलो मीटर लांबीच्या मुख्य शर्यतीला मुंबईकरांसह देशी परदेशी धावपटूंनी मोठ्या  संख्येने हजेरी लावली. या स्पर्धेवर नेहमीप्रमाणेच केनियन आणि इथिओपियांच्या  धावपटूंचे वर्चस्व दिसून आले.

राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी  या 14 व्या स्टँडर्ड चॅर्टर्ड मुंबई मॅरेथॉनचे उद्घाटन केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, क्रीडामंत्री विनोद तावडे, अभिनेता जॉन अब्राहम, राहुल बोस आदींनी हजेरी लावली होती.

MARATHON2

मुंबई मॅरेथॉनच्या विविध गटांतील पहिले तीन धावपटू

खुला पुरुष गट

  1. टांझानियाच्या अल्फोन्स सिम्बू -(2 तास 9 मिनिटे 32 सेकंद)
  2. केनियाचा जोशुओ किपकोरिर -(2 तास 9 मिनिटे 50 सेकंद)
  3. एलिउद बारंगेटुनी -(2 तास 10 मिनिटे 39 सेकंद)

खुला  महिला गट

  1. केनियाची बोर्नेस किटुर -(2 तास 29 मिनिटे 2 सेकंद)
  2. इथिओपियाची चाल्तु ताफा-(2 तास 33 मिनिटे 3 सेकंद)
  3. इथिओपियाची तिजिस्ट गिर्मा -(2 तास 33 मिनिटे 19 सेकंद)

भारतीय पुरूष

  1. खेता राम – (2 तास 19 मिनिटे 51 सेकंद)
  2. बहादुर सिंग धोनी -(2 तास 19 मिनिटे 57 सेकंद)
  3. टी.एच. संजिथ -(2 तास 21 मिनिटे 19 सेकंद)

महिला पुरुष

  1. ज्योती गवते- (2 तास 50 मिनिटे 53 सेकंद)
  2. श्वामली सिंग – (3 तास 8 मिनिटे 41 सेकंद)
  3. जिग्मेट डोल्मा – (3तास 14 मिनिटे 38 सेकंद)

अर्ध मॅरेथॉन पुरूष

  1. लक्ष्मणन जी. – (1 तास 5 मिनिटे 5 सेकंद)
  2. सचिन पाटील – (1 तास 6 मिनिटे 22 सेकंद)
  3. दीपक कुमार – (1 तास 6 मिनिटे 28 सेकंद)

अर्ध मॅरेथॉन महिला

  1. मोनिका अत्रे -(1तास 19 मिनिटे 13 सेकंद)
  2. मिनाक्षी पाटील – (1 तास 20 मिनिटे 53 सेकंद)
  3. अनुराधा सिंग -(1 तास 25 मिनिटे 20 सेकंद)