Puffed rice हलके फुलके कुरमुरे आरोग्यासाठी लाभदायक

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 29 सप्टेंबर 2023

हलके- फुलके कुरमुरे सर्व लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीचे असतात. कुरकुरीत असल्याने चवीलाही छान लागतात. काही भागांमध्ये यांना मुरमुरे असेही म्हटले जाते. कुरमु-याचा वापर भेळ, चिवडा यांसाठीही केला जातो, मुख्यतः नाष्ट्याचे अनेक पदार्थ कुरमु-यापासू तयार केले जातात. सोडियम आणि अन्टीऑक्सीडेंसनी युक्त असलेले कुरमुरे केवळ चवीलाच फायद्याचे नसतात तर तुमच्या तब्येतीसाठीही फायदेशीर असतात. वजन कमी करण्यासाठी कुरमु-याचा वापर अनेकांकडून आपल्या आहारामध्ये केला जात असतो. कर्बोदके, प्रथिने, मॅग्नेशियम, कॅल्शियम याचा मोठा स्त्रोत असलेला पदार्थ म्हणूनही कुरमुरे ओळखले जातात. या कुरमु-याचे काही फायदे आपण पाहणार आहोत.

कुरमुरे कमी कॅलरी असलेला पदार्थ आहे. त्यामुळे वजन कमी करण्याच्या आहारात याचा वापर केला जातो. तरिही वजन कमी करणा-यांना कुरमुरे खाण्याचा सल्ला दिला जातो.

ही बातमी वाचा : Navi Mumbai Morbe Dam: जलपूजनाचा वाद चिघळला

उच्च रक्तदाब नियंत्रण

कुरमु-यात सोडिमचे प्रमाण कमी असते त्यामुळे दुस-या प्रोसेस्ड स्नॅकच्या तुलनेत कुरमुरे हा एक चांगला पर्याय असतो. उच्च रक्तदाब असणा-या रूग्णांसाठी सोडियमचे सेवन नियंत्रणात आणण्यासाठी मदत होते. सोडिमचे सेवन कमी प्रमाणात झाल्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो.

हा लेख वाचा : नाचणी, बाजरी, ज्वारी खा अन् तंदुरुस्त राहा !

फॅट फ्री

कॅलरी आणि फॅट नियंत्रणात राखण्यासाठी कुरमुरे हा एक चांगला पर्याय आहे. लो फॅट आणि लो कॅलरी फूड असल्याने भाज्या किंवा फळांसोबत नाष्त्याचे विविध पदार्थ म्हणून वापरले जातात. कुरमुरे ग्लुटेन फ्री असल्याने खाण्याप्रती संवेदनशील असलेल्यांनाही याचा फायदा होतो.

ही बातमी वाचा : मधुमेह नियंत्रित करण्यासाठी ओव्याचा वापर

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

अन्टीऑक्सीडंट असल्याने आहारासाठी अनेकांकडून कुरमुरे पर्याय म्हणून उपयोगात आणले जातात. याच गुणामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही कुरमुरे आहारात समाविष्ट केले जातात. कुरमु-यात तंतुयम घटक पदार्थ असल्याने बष्ठकोष्ठता जाणवत नाही.

ही बातमी वाचा : फुफ्फुसांचे आरोग्य तपासण्यासाठी सिक्स मिनिट वॉक टेस्ट

कार्बोहायड्रेटचा साठा

आपल्या शरीराला उर्जा देणारी कार्बोहायड्रेट अर्थात कर्बोदके. पोषकद्रव्यांच्या स्वरूपात शरीसाठी ऊर्जेचा साठा मानला जातो. कुरमुरे अशा कर्बोदकांचा साठा असतात. मांसपेशीना मजबूती देण्यासाठी कुरमुरे फायदेशीर मानले जातात. कुरमु-याचे सेवन केल्यानंतर पोट भरलेले राहते त्यामुळे फारशी भूकही लागत नाही.

========================================================

 

========================================================