नवी मुंबईत चोरट्यांनी वर्षभरात 6 कोटींचा ऐवज लुटला

नवी मुंबई, ता 13 /AV News Bureau:

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत लुटमार, घरफोड्यांच्या घटनांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत घट झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. मात्र असे असले तरी गेल्या वर्षभरात चोरट्यांनी तब्बल 6 कोटी 9 लाख 34 हजार 699 रुपयांचा ऐवज लुटल्याचे उघडकीस आले आहे. त्यापैकी 1 कोटी 81 लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांकडून परत मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे. नवी मुंबई पोलिसांच्या वार्षिक पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.

crime chart robery

recovery