सुरक्षिततेचे नियम पाळा, विद्युत अपघात टाळा!

वीज हा मानवी जीवनातील एक अविभाज्य घटक झालेला आहे. शहर असो वा ग्रामीण भाग विजेची मागणी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. विजेशिवाय जगणे तसूभरही शक्य नाही. दैनंदिन जीवन असो वा उद्योग, व्यवसाय, शेती असो वीज या सर्व गोष्टींसाठी वीज लागते. मात्र विजेचा वापर करताना अनेकदा जीवघेणे अपघात होतात. त्यामुळे विजेपासून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेणे अतिशय महत्वाचे आहे.

  • दर्जेदार उपकरणांचा वापर
  • घर, उद्योग, कार्यालय, अथवा शेती असो वीज वापरतांना प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. वीज पुरवठा घेताना किंवा वेळोवेळी विद्युत केबल स्विचेस अथवा इतर उपकरणे ही आय.एस.आय.प्रमाणित असल्याचे व योग्य क्षमतेचे असल्याची खात्री करावी. विद्युत सर्किटवर क्षमतेपेक्षा जास्त भार टाकू नये. प्रमाणित कंत्राटदाराकडूनच विद्युतीकरणची कामे करून घ्यावीत. वायरिंग एम.सी.बी. (मिनीएचर सर्किट ब्रेकर) वापरावे जेणे करून अतिभार, शॉर्टसर्किटमुळे धोका निर्माण मंडळाने प्रमाणित केलेली उपकरणे वापरावीत उदा.मिक्सर, पाण्याचे हिटर, ग्राइंडर, फ्रीज, डीप फ्रीजर, वाशिंग मशीन इत्यादी.
  • योग्य अर्थिंग
  • वीज वापरामध्ये आर्थिंग हा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे. अनेक अपघात हे योग्य प्रकारची अर्थिंग न केल्यामुळे पडल्याचे सिध्द झाले आहे. त्यामुळे सर्व वायरिंग इनस्टोलेशन कॉपर प्लेट किंवा कॉपर राँड कार्यक्षमपणे लावून घेणे सुरक्षिततेच्या दृष्टीने गरजेचे आहे.

 इन्सुलेटेड वायरचा उपयोग

  • अर्थ लिकेजच्यापासून होणारा धोका टाळण्यासठी ई.एल.सी.बी. (अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर) वापरावे मोठमोठ्या अपार्टमेंटमध्ये२० ते ५० मिटरची स्वतंत्र रूम असते. मात्र बऱ्याचवेळा त्याकडे दुर्लक्ष केल्या जाते. मिटर रूम स्वच्छ्, प्रकाशित व हवेशीर असली पाहिजे. पावसाळयात मिटररूममध्ये पाणी जाणार नाही, त्याच बरोबर भिंती ओल्या होणार नाही याची काळजी घ्यावी. मिटररूमचा वापर स्टोअर रूम म्हणून करू नये. मिटर रूममध्ये उंदरांचा वावर होणार नाही याच्याकडे लक्ष दिले पाहिजे. ज्वालाग्राही पदार्थ ठेवण्यास टाळायला हवे. न्युट्रल वापरासाठी उघड्या वायरचा वापर न करता इन्सुलेटेड वायरचा वापर करावा. एका सर्कीटमध्ये मल्टीप्लग / तारा घालू नका, त्यामुळे शॉर्टसर्किट होवून आगीस नियंत्रण दिले जाते.
  • मेन स्विचचा वापर
  • शॉर्ट सर्किटमुळेआग लागल्यास प्रथम मेन स्वीच बंद करा. विद्युत रोधक अग्निशामकाचा वापर करा, पाण्याचा वापर करू नका. प्लग, पिन, बटन, बोर्ड यांना तडे गेल्यास ती त्वरित बदलावी. पंखे, इस्त्री कुलर वापरतांना त्यात वीज प्रवाह उतरू शकतो याची जाणीव ठेवूनच सावधानतेणे ते हाताळावे.
  • जीवन मूल्य जाणूनच काम करणे
  • वीजे विषयी अज्ञानतसेच निष्काळजीपणा, फाजील, आत्मविश्वास हे अधिक भयंकर आहे. अति उत्साहात विजेचा वापर करताना निष्णात लोक देखील हातात रबरी ग्लोवज घालणे, पाण्यात सेफ्टी बूट वापरणे तसेच वीज पुरवठा बंद करून मग काम करणे अशा छोट्या छोट्या बाबीकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे जीवीतहानी झाल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. रात्रंदिवस विजेच्या क्षेत्रात काम करणारे कामगार, जनमित्र, वायरमन यांनी आपले जीवनमूल्य जाणून घेवून, आपल्यावर आपल्या कुटुंबाचीही जबाबदारी असल्याचे भान ठेवूनच विद्युतीकरणाचे काम करावे. सुरक्षिततेचे उपाय हे केवळ आपल्यासाठी नसून आपल्याशी निगडीत प्रत्येक घटकासाठी तितकेच महत्वाचे आहे.
  • दैनंदिन वीज वापराच्या महत्वाच्या बाबी

विद्युत उपकरणे ओल्या हाताने हाताळू नका. विज वाहीनीच्या खाली किंवा जवळ कोणतेही बांधकाम करू नका. विद्युत खांब किंवा तणाव ताराला गुरे ढोरे बांधू नका. तात्पुरते लोंबणारे वायर वापरू नका. विजेच्या अनधिकृत वापर टाळा. कुलरमध्ये पाणी टाकतांना विज पुरवठा बंद ठेवा. विजेच्या तारा तुटून जमिनीवर पडल्या असतील तर त्यास स्पर्श करू नका किंवा ओलांडून जाण्याचा प्रयत्न करू नका. अशी घटना अथवा संभाव्य धोका लक्षात आल्यास तात्काळ महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधा अथवा 1800-200-3435 किंवा 1800-233-3435 या टोलफ्री क्रमांकावर संपर्क करा.

  • प्रथमोपचार

माणसाच्या किंवा प्राण्यांच्या शरीरातून वीज प्रवाह वाहिल्यास जबरदस्त धक्का बसतो. धक्का किती प्रमाणात बसेल हे वाहणारा प्रवाह आणि हा प्रवाह किती काळ वाहीला यावर अवलंबून असते. शरीर ओले असेल तर प्रमाण वाढते. 10 मि.ली. अंम्पियर करंट माणसाला अधू करू शकतो तर 30 मि.ली. अंम्पियर करंट श्वसनप्रक्रिया थांबवू शकतो. इलेक्ट्रिक शॉक बसलेल्या माणसाला त्वरित प्रथमोपचार मिळाल्यास त्याचा जीव वाचवू शकतो. प्रथमोपचाराचा हेतू प्राणाचे रक्षण करणे हा आहे. तुमच्या प्रयत्नाने त्याची प्रकृती जास्त न खालावता सुधारावी त्याकरिता दोन प्राथमिक गोष्टी कराव्या.

1.विजेचा धक्का बसलेल्या व्यक्तीची सुटका.

2.सुटका केल्यानंतर प्रथमोपचाराची योग्य प्रक्रिया.

  • विद्युत धक्का बसलेली व्यक्ती जागीच अटकलेली असल्यास प्रथम वीज पुरवठा बंद करा, सदर व्यंक्तीला मुक्त करण्यासाठी कोरडे व इन्सुलेटेड असलेल्या साधनांचा वापर करा. हॅडग्लोब्स्, बांबू, दोरी, कोट, बूट ई. वापरावे अशा प्रकारे व्यक्तीची सुटका केल्यानंतर परिस्थितीनुसार त्याला योग्य प्रथमोपचार सुरू करावा.
  • धक्याचे प्रमाण कमी असल्यास हात किंवा पाय बधीर झालेले असतात. अशा वेळी एका दिशेने मसाज केल्यास रक्तप्रवाह सुरळीत होवून त्या व्याक्तीला आराम मिळतो. प्रथमोपचार ही केवळ वैद्यकीय उपचार पध्दती नाही. तर बाधित व्यक्तीला मानसिक आधार देऊन त्याचे मनोधेर्य वाढवणे हाही एक महत्वाचा भाग आहे.
  • तोंडाने तोंडाला श्वास देणे रूग्णांच्या तोंडावर आपले तोंड पक्के दाबून तुमच्या श्वास आत सोडा. त्याची छाती फुगते कि नाही ते पहा. तुमच्या श्वास संपल्यावर तोंड बाजूला करून पुन्हा श्वास भरून घ्या. 4/5 सेकंदांच्या अंतराने प्रक्रिया वारंवार चालू ठेवा.
  • जो पर्यंत हृदयाचे ठोके चालू आहेत, तो पर्यंतकृत्रि श्वास देणे चालूच ठेवावे. तुम्ही देत असलेली शुध्द् हवा रक्त अशुध्द होऊ देणार नाही.
  • रूग्णाला उताणे झोपवून त्याच्या एका बाजूला गुडघ्यावर बसा छातीवर तुमच्या हाताने एकावर एक ठेवून दाब द्या. उच्छश्वास बाहेर पडेल. हातांच्या दाबकमी करा म्हणजे बाहेरची हवा आत जाईल. अशी तालबध्द प्रक्रिया सुरूच ठेवा. रूग्णाला लवकरात लवकर दवाखाण्यात नेण्याची व्यवस्था करा; पण तोपर्यंत कृत्रिम श्वासोश्वास प्रक्रिया चालू ठेवा.
  • रूग्ण बेशुध्द असताना पाणी पाजू नका. शुध्दीवर असल्यास चमच्याने थोडे थोडे पाणी पाजा. पाण्यात सोडा किंवा चिमुटभर मीठ टाका. पाणी देण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • अपघातानंतरची पहिलीलघवी तपासणीसाठी ठेवा.
  • कृत्रिम श्वसणाच्या तुमच्या प्रयत्नाने रूग्ण पूर्ण बरा झाल्यावर त्याला चहा द्या. रूग्णाला चालवू नका.