राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

 मुंबई,21 जानेवारी 2017/AV News Bureau:

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नव्या यादीत ३१ उमेदवारांचा समावेश असून आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने ७६ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली असल्याची माहिती राष्ट्रवादी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर, यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जाहीरनामा तयार असून २७ किंवा २८ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात येईल, असे अहिर यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, मुंबई उपाध्यक्ष शिवाजीराव नलावडे, मुंबई सरचिटणीस नरेंद्र राणे, प्रवक्ते संजय तटकरे आणि क्लाईड क्रास्टो उपस्थित होते.