उरण विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी रोहित घरत

पनवेल, 28 जानेवारी 2017/AV News Bureau:

उरण विधानसभा युवक काँग्रे अध्यक्षपदी रोहित श्रीकांत घरत यांची निवड करण्यात आली आहे.

उरण येथे झालेल्या युवक काँग्रेसच्या मेळाव्यात काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष आर.सी.घर, जिल्हा उपाध्यक्ष आणि कामगार नेते महेंद्र घरत, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस मनिषा साळुंखे, मावळ लोकसभा युवक काँग्रेस अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, कामगार नेते शाम म्हात्रे यांच्याहस्ते रोहित घरत यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी मिलिंद पाडगावकर, जे.डी. जोशी, कुणाल घरत, सुचित्रा घर, अभिजित घरत, सुमित घरत, सौरभ पाटील, प्रणय कोळी, संदेश घरत, मयुरेश घरत, रोहित पाटील, वैभव पाटील, हार्दिक घरत, सिद्धेश म्हात्रे, करण घरत, निलेश पोटे, दिपक बरवी, अरुण पाटील, दर्पण निशानदार, जितेश म्हात्रे, अक्षय पाटील, आदी पक्षाचे युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी आणि जोमाने काम करण्याबाबत उपस्थित युवक कार्यकर्त्यांनी शपथ घेतली. यावेळी क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात ठसा उमटविणाऱ्या उरण विभागातील युवकांचा सन्मान करण्यात आला.

काँग्रेसमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाला संधी मिळणार असे सांगत पक्षासाठी सर्वांनी मनापासून काम करावे, असे आवाहन महेंद्र घरत यांनी यावेळी केले.