कोकण रेल्वेच्या 28 स्थानकांवर मोफत वायफाय सेवेचे उद्घाटन

मुंबई,21 मे 2017/ AV News Bureau:

कोकण रेल्वेच्या 28 स्थानकांवर मोफत वायफाय सेवेचे उद्घाटन आज केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात आले. याआधी रत्नागिरी, मडगाव, चिपळूण, कुडाळ येथे सेवा सुरु आहे. आता कोलाड ते मडुरे या दरम्यानच्या स्थानकांवर ही सुविधा उपलब्ध असणार आहे.

सिस्कॉन, जॉयस्टरने ही सेवा उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ही कंपनी सामाजिक दायित्व निधी म्हणजेच सीएसआर फंडातून ही सेवा पुरवणार आहे. रेल्वे स्थानकाचे प्रवेशद्वार आणि स्थानकाचा अंतर्गत परिसर यामध्ये वायफाय उपलब्ध असेल. कमीतकमी 100 आणि जास्तीत जास्त 300 लोक एकाचवेळी वायफायचा वापर करू शकणार आहेत.

मोफत वायफाय कसे मिळवाल ?

  • जॉयस्टरचे मोबाईल अॅप तुम्हाला मोबाईलमध्ये डाऊनलोड करावे लागेल.
  • अॅपमध्ये तुमचं नाव, मोबाईल क्रमांक नोंदवल्यानंतर तुम्हाला वन टाईम पासवर्ड मिळेल.
  • ओटीपीची नोंद केल्यानंतर तुम्ही वायफाय वापरू शकता.
  • त्यानंतर तुम्हाला 2 एमबीपीएस पर्यंत इंटरनेट स्पीड मिळू शकेल.