निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहा ठिकाणी चेकपोस्ट नाके

ठाणे,6 फेब्रुवारी 2017/ AV News Bureau:

ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2017 च्या पार्श्वभूमिवर राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ठाणे महानगरपालिकेने आदर्श आचार संहितेच्या प्रभावी अमंल बजावणीसाठी ठाणे शहर परिसरात दहा ठिकाणी चेक पोस्ट नाके उभारले आहेत.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील अतिमहत्त्वाची ठिकाणे, नाके, आदी ठिकाणाहून मद्य, शस्त्रांची अवैध वाहतूक  तसेच मतदारांना प्रलोभनात्मक ठरतील अशा वस्तुंची, पैशांची वाहतूक होऊ शकते, अशा ठिकाणी हे चेक पोस्ट नाके तपासणीसाठी कार्यरत आहेत.

  • चेकपोस्ट

विटावा, शिळफाटा, देसाईनाका, खारीगाव, आनंदनगर, बाळकूम, टाटा फयुजन, मॉडेला (वागळे), नागला बंदर, गोल्डन डाईज नाका, इत्यादी ठिकाणी हे चेक पोस्ट नाके कार्यरत आहेत. या सर्व ठिकाणी प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यात येत असून बेकायदेशीर वस्तु जप्त करून कडक कार्यवाही करण्यात येईल. हे सर्व चेक पोस्ट नाक्यांवर  सी.सी.टी.व्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येणार आहे.