‘एल्फिन्स्टनचे ‘प्रभादेवी’ तर ‘सीएसटी’चे ‘सीएसएमटी’ नाव

नामबदलास केंद्र सरकारची मान्यता

राजपत्रात प्रसिद्ध करुन तातडीने नामबदल करणार

मुंबई, 6 मे 2017/AV News Bureau:

मुंबईतील ‘एल्फिन्स्टन रोड’ रेल्वे स्थानकाचे नाव ‘प्रभादेवी’ रेल्वे स्थानक तर ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस’ रेल्वे स्थानकाचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ असे करण्यास केंद्र सरकारच्या गृहविभागाने मान्यता दिल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली.

राज्य शासनाने या दोन्ही स्थानकांची सुधारीत नावे इंग्रजी व देवनागरी लिपीत राजपत्रात प्रसिद्ध करुन त्याप्रमाणे नावांमध्ये बदल करावेत, असे केंद्रीय गृहविभागाने कळविले आहे.

या दोन्ही स्थानकांच्या नावामध्ये बदल व्हावेत ही समस्त मुंबईकरांची तसेच राज्यातील जनतेची भावना होती. यासाठी  अनेक वर्षांपासून केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरु होता. ‘एल्फिन्स्टन  रोड’ रेल्वे स्थानकाचे नाव ‘प्रभादेवी’ असे करण्याबाबत  १९९१ पासून प्रयत्न करीत होतो. अखेर  या पाठपुराव्यास यश आहे, असे रावते यांनी सांगितले.