11 व 12 फेब्रुवारीला महापौर चषक बुध्दीबळ स्पर्धा

नवी मुंबई, 8 फेब्रुवारी 2017 /AV News Bureau:

‘नवी मुंबई महापौर चषक बुध्दीबळ स्पर्धा 2016-17’ 10 व 11 फेब्रुवारी रोजी ऐरोली सेक्टर 3 येथील श्रीराम विद्यालयात आयोजित करण्यात आली आहे.

नवी मुंबई महापालिका क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीच्या वतीने आयोजित या स्पर्धेत नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिक्षेत्रासह ठाणे जिल्हयातील वयोगट 9, 11 व 15 वर्षाआतील मुले व मुली तसेच 15 वर्षावरील खुल्या गटात पुरुष व महिला बुध्दीबळ खेळाडू सहभागी होत आहेत.

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या वयोगट 9, 11 व 15 वर्षाखालील मुलांच्या प्रत्येक गटाकरीता पहिल्या 10 क्रमांकांसाठी पारितोषिके दिली जाणार आहेत. तसेच वयोगट 9, 11 व 15 वर्षाखालील मुलींच्या प्रत्येक गटाकरीता पहिल्या 8 क्रमांकासाठी पारितोषिके दिली जाणार आहेत. खुला पुरुष गटाकरीता पहिल्या 30 क्रमांकांना व खुल्या महिला गटाकरीता पहिल्या 6 क्रमांकांना परितोषिके प्रदान केली जाणार आहे.  एकूण 1 लाख 58 हजार 500 रुपये रक्कमेची पारितेषिके विविध गटातील विजेत्या बुध्दीबळपटूंना दिली जाणार आहेत.