काश्मीरमध्ये 4 दहशतवादी ठार, 3 जवान शहीद

जम्मू-काश्मीर, 12 फेब्रुवारी 2017:

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात सीमेपलिकडून घुसखोरी करणाऱ्या 4 दहशतवाद्यांना भारतीय लष्कराने ठार केले . या धुमश्चक्रीत भारताच्या 3 जवानांनाही वीरमरण आले.

कुलगाम जिल्ह्यातील स्थानिक पोलिसांकडून दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय जवानांनी यारीपोरा भागात आज पहाटेपासून शोध मोहिम सुरू केली . यावेळी उडालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खातमा केला. तर अन्य काही दहशतवादी जखमी झाले असून ते लपून बसल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी भारतीय लष्कराने व्यापक मोहीम हाती घेतली आहे.