कुसुमाग्रज वाचनालयाच्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम

kusumagraj

नवी मुंबई,17 फेब्रुवारी 2017/ AV News Bureau:

नेरूळ येथील कवी कुसुमाग्रज  वाचनालयाच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त वाचनालयाच्या प्रांगणात विशेष कार्यक्रम होणार आहेत. त्यामध्ये 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजता चंद्रशेखर वझे व सहकलाकार  “बेताल झालेत सूर ”  हा कार्यक्रम सादर करणार आहेत. तर 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त शिवचरित्रावर  आधारित ” प्रतापराव गुजर काका व शिवराज्यभिषेक ” हा एकपात्री कार्यक्रम डॉ. अर्पिता कुळकर्णी या सादर करणार आहेत. हा कार्यक्रम कवी कुसुमाग्रज वाचनालय, महावीर कुटीर, प्लॉट नंबर १९,  सेक्टर ४२, सिवूड्स, नवी मुंबई येथे सायंकाळी होणार आहे.